द्रोणाचार्य दिनेश लाड यांचे नागपुरात स्वागत

सोशल

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

नागपुर:भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच शार्दुल ठाकूर चे कोच, व क्रीडा प्रशिक्षकाचा भारत सरकार तर्फे देण्यात येणारा सर्वोच्च पुरस्कार म्हणजेच द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त श्री.दिनेश लाड हे एका क्रिकेट टुर्नामेंट करीता नागपुरात आले असताना माजी क्रिकेट पटू व मनसेचे प्रदेश सरचिटणीस व शिवराज प्रतिष्ठान नागपूर चे अध्यक्ष हेमंत गडकरी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ व मिठाई देऊन स्वागत केले,यापूर्वीही त्यांना द्रोणाचार्य पुरस्कार घोषित होताच मुंबईच्या बोरिवलीतील स्वामी विवेकानंद इंटर नेशनल शाळेच्या ग्राउंड वर जाऊन हेमंत गडकरी यांनी त्यांचा गौरव केला होता, तेव्हापासून श्री दिनेश लाड व हेमंत गडकरी यांचे अतिशय चांगल ऋणानुबंध राहिले आहे, लाड यांनी नागपुरात येताच हेमंत यांचेशी संपर्क साधला , आज नागपुरातील सामना आटोपताच लाड सर यांनी बिंझानी कॉलेज च्या ग्राउंड वरील अकादमी ला भेट देऊन येथील उदयोन्मुख खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन केले ,लाड सरांशी गप्पा रंगल्या असताना कृपया आमच्या आवडत्या रोहित शर्मा ला थोड संयम ठेऊन खेळण्याचा सल्ला जरूर द्यावा व हिटमॅन ने मोठी खेळी खेळावी जेणेकरून भारतीय संघाला त्याचा फायदा होईल अशा भावना हेमंत गडकरी यांनी श्री दिनेश लाड सर यांच्याकडे व्यक्त केल्या ,यावेळी,अकादमीचे श्री.राहुल खराबे,पूनित मिश्रा,श्री आंबेकर व विक्की कोरडे उपस्थित होते

CLICK TO SHARE