नमो महारोजगार मेळावा ६ डिसेंबर काटोल येथे नोंदणी

सोशल

सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींकरिता सुवर्ण संधी

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

काटोल:दिनांक ३.११.२०२३महाराष्ट्र शासनाने कौशल्य रोजगार उद्योजक्ता व नविन्यता विभाग महाराष्ट्र शासनाचे वतीने सुशिक्षित बेरोजगार युवक युवतींकरिता करिता दि.९ व १० डिसेंबर 2023 रोज शनिवार व रविवारला *नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे*. काटोल व नरखेड तालुक्यातील सुशिक्षित-युवक-युवतींना महारोजगार मेळाव्यात सहभाग घेता यावा याकरीता भारतीय जनता पार्टीच्या वतीने दि.6 डिसेंबर 2023 रोज बुधवार ला सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत *कृषी उत्पन्न बाजार समिती काटोलच्या* परिसरात नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.नमो महारोजगार मेळाव्यात देशभरातील 500 हून अधिक कंपन्या सहभागी होणार आहेत. काटोल नरखेड विधानसभा क्षेत्रातील विविध क्षेत्रातील 10 वी, 12 वी, विविध शाखेतील पदवीधर, आय.टी.आय ,सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींनी,काटोल येथे आयोजित नोंदणी शिबिरामध्ये नोंदणी करून घेऊन नोकरीची संधी प्राप्त करावी असे आव्हान काटोल कृ.उ.बा.समिती सभापती भाजपा नेते चरणसिंग ठाकूर, जिल्हा महामंत्री दिनेश ठाकरे, शहराध्यक्ष विजय महाजन, तालुकाध्यक्ष निलेश धोटे, यांनी केले आहे व अधिक माहिती करिता.9822732221,7020600070, या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा असे आयोजकांनी कळविले आहे.

CLICK TO SHARE