अल्लीपूर येथे राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

सोशल

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५५व्या पुण्यतिथी नीमीत्य आयोजित अल्लीपूर येथे राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धा

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त अखिल भारतीय गुरुदेव सेवा मंडळ व परिवर्तन युवा मंडळाच्या वतीने श्री गुरुदेव प्रार्थना → मंदिर पोलिस स्टेशन रोड येथे ८ ते ११ डिसेंबर दरम्यान राज्यस्तरीय खंजेरी भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. घटस्थापना ६ रोजी पुंडलिक कामठी यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी ५ वाजता सामूहिक ध्यान, योगासने व सायंकाळी सामुदायिक प्रार्थना होईल. भजन स्पर्धेचे उद्घाटन ८ रोजी सायंकाळी ६ वाजता दीपक भांडेकर महाराज यांच्या हस्ते होईल. ७ वाजता सप्तखंजेरी वादक दीपक भांडेकर यांचे समाजप्रबोधन होईल. ९ रोजी तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा, १० रोजी दुपारी रक्तदान शिबिर, ११ रोजी शहरी पुरुष गट भजन स्पर्धा सुरू होईल. भजन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी मंडळाचे कैलास बाळबुधे, संदीप नरड, सुधाकर ढोबळे यांच्यासोबत संपर्क साधावा, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

CLICK TO SHARE