अल्लीपूर येथे जागतिक अपंग दिन

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

प्रहार क्रांती अपंग संघटनेद्वारे अल्लीपूर येथे जागतिक अपंग दिनानिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून सरपंच चंदनखेडे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नाना ढगे, रुग्ण मित्र गजू कुबडे, ग्रामपंचायत सदस्य सतीश काळे, राहुल वाटखेडे, संजय जाधव, हनुमंत झोटिंग, एस महाजन, संजय पाटनकर, संजय आस्टनकर, सचिन तळवेकर उपस्थित होते. जागतिक अपंग दिनानिमित्त कार्यक्रमाचा एकाच उद्देश होता की जागतिक अपंग दिनानिमित्त सर्व अपंग बांधवांना शासनाच्या विविध योजनेचा लाभाबाबत माहिती मिळावी या उद्देशाने संघटनेच्या मार्फत कार्यक्रम घेतला. मान्यवरांनी अपंग बांधवांना शासकीय योजनेबाबत माहिती दिली संचालन सतीश काळे यांनी केले. आभार प्रशांत बगवे यांनी मानले.

CLICK TO SHARE