डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन साजरा

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपुर येथील बुद्ध विहारात महापरिनिर्वाणदिन साजरा करण्यात आला. सर्वप्रथम डॉक्टर बाबासाहेब यांच्या प्रतिमेला हार अर्पन करून आदरांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती माजी उपसरपंच रामु धनविज, समाजसेवक रत्नाकर वैद्य, ग्रा. प. सदस्य सतीश काळे, सपना राऊत, सवीता साखरकर वसंत कांबळे, नयन धनवीज, प्रभा वानखेडे, आदी उपस्थित होते. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनातील अनेक प्रसंगाची आठवण करून दिली. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहीती दिली.

CLICK TO SHARE