नगाजी महाराज पालखीचे भव्य स्वागत

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

अल्लीपूर येथे नगाजी महाराज पालखीच्या आगमना निमित्ताने अनेक धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या पालखी उत्सवाच्या निमित्ताने भजन दिंडी यासारख्या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे आयोजन येथील श्री सदानंद दुर्गा पुजा उत्सव समितीच्या वतीने नगाजी महाराजाच्या पालखीच्या स्वागताची जयत तयारी करण्यात आली होती. यावेळी भव्य अशा महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते, या महाप्रसादाचा परिसरातील नागरिक आणि गावकऱ्यांनी लाभ घेतला. अनेकांनी या पालखीचे दर्शन घेतले.

CLICK TO SHARE