अवकाळी पावसाचा पिकांना फटका

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपुर

दोन दिवस उघाड दिलेल्या अवकाळी पावसाने पुन्हा आजबुधवार ६ रोजी पासून सुरुवात केली. या पावसाचा खरीपसह रबीहंगामातील पिकांना फटका बसत आहे. ढगाळ वातावरणामुळे पिकांवररोगांचे प्रमाणसुद्धा वाढले आहे. कपाशी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसानहोत असल्याचे शेतकरी हवालदिल झाला आहे. मागील ८ ते १०दिवसांपासून जिल्ह्यात सर्वत्र ढगाळ वातावरण कायम असून अवकाळीपावसाने हजेरी लावली. या पावसामुळे कपाशीसह तूर पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. वेचणीसाठी आलेला कापूस भिजला असूनखाली लोंबकळत आहे. तर तुरीचा फुलोरासुद्धा गळून पडला आहे. यासहरबी हंगामातील गहू आणि हरभरा पिकालासुद्धा फटका बसला आहे.दोन दिवसानंतर सूर्य नारायण उगवल्याने शेतकऱ्यांच्या पदरात जीव पडला.शेतकरी पुन्हा कामाला लागले होते. शेतशिवार पांढऱ्या सोन्याने फुटूनगेल्याने सोमवारपासून अनेक शेतकऱ्यांनी कापूस वेचणीस प्रारंभ केला.दोन दिवस वेचाई होत नाही तोच पुन्हा बुधवार 6 रोजी सकाळपासूनचपावसाची भुरभूर सुरू झाली. परिणामी, पुन्हा शेतीची कामे ठप्प पडली.सतत सुरू असलेल्या पावसामुळे शेतातील कापूस लोंबकळत आहे.ढगाळ वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे.कपाशीवर बोंड अळी आल्याचे शेतकरी बोलत आहेत. परिणामी,कापसाच्या उत्पादनात घट होणार आहे. तर रबी हंगामातील गहू आणिचणा पिकालासुद्धा फटका बसणार आहे. यंदा सुरुवातीपासून शेतकऱ्यांनानैसर्गिक आपत्तीचा सामना करावा लागत आहे.

CLICK TO SHARE