समुद्रपूर येथील डि.बी. पथक व गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी परीसरातील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम राबविली

क्राइम

प्रतिनिधी आसिफ मलनस हिंगणघाट

आज दिनांक 05/12/2023 रोजी पो.स्टे. समुद्रपूर येथील डि.बी. पथक व गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी परीसरातील मौजा गणेशपुर पारधी बेडा येथे वॉशआउट मोहिम राबविली असता, मोहिमेदरम्यान बेड्यालगत असलेल्या झुडपी शिवारात झुडपात लपवुन असलेले व जमिनीत गाढुन असलेले एकुण 58 प्लास्टीक व लोखंडी ड्रममध्ये अंदाजे 6,450 ली. कच्चा मोहा सडवा रसायण, 12 प्लास्टीक कॅनमध्ये अंदाजे 240 ली. मोहा दारू, 3 पोत्यामध्ये अंदाजे 60 किलो गुळ, 3 जर्मन घमेले व भट्टी साहित्य असा जु.किं. 3,76,100 रू चा मुद्देमाल मिळुन आल्याने, संपुर्ण मुद्देमाल जप्त करून, जागीच नाश करण्यात आला. तसेच 4 आरोपी विरूध्द दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आले.सदर ची कारवाई पोलीस अधीक्षक मा.नुरुल हसन सा, अपर पोलीस अधीक्षक मा.सागर कवडे सा ,उप विभागीय पोलीस अधिकारी मा.रोशन पंडित सा, यांचे मार्गदर्शनात ठाणेदार संतोष शेंगावकर यांचे निर्देशाप्रमाणे पो हवा अरविंद येनूरकर, पो ना रवी पुरोहित,राजेश शेंडे, सचिन भारशंकर,वैभव चरडे,व गृहरक्षक दलाचे सैनिक यांनी केली.

CLICK TO SHARE