राष्ट्रीय राजमार्ग हद्दीतिल अतिक्रमण कार्यवाही विरोधात मुख्याधिकारी यांनी केला पदाचा दुरुउपयोग

सोशल

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

नगर पालिके कडुन दी. 07- 11- 2023 ला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण व हिंगणघाट नगर पालिका यांनी संयुक्त विद्यमानाने तेलंग पेट्रोल पंप समोरील अतिक्रमण काडले हे अतिक्रमण नियमानुसार नाही असा पुरावा विक्की कोटेवार यांनी दिला हिंगणघाट मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी राष्ट्रीय राजमार्ग हद्दीत येत असलेले अतिक्रमण काडताना त्यांनी नियमानुसार कार्यवाही केली नाही. खोटी माहिती सांगुन कागदपत्र केली.सुरवाती पासूनच नियमानुसार कार्यवाही केली नाही. हिंगणघाट नगर पालिकेला विक्की कोटेवार याचे अतिक्रमण राष्ट्रीय राजमार्ग हद्दीत येत असल्याचे पुरावा दिला त्यामुळे राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण नागपूर यांना हिंगणघाट मुख्याधिकारी हर्षल गायकवाड यांनी दी.28-09-2023 ला पत्र पाठविले. विक्की कोटेवार याने दी.23-10 2023 ला हिंगणघाट नगर पालिकेकडून एकट्यावरच कार्यवाही का ? त्यामुळे नियमानुसार कार्यवाही करावी पत्र दिले . मुख्याधिकारी यांनी पदाचा दुरउपयोग करून दी.07-11-2023 ला अतिक्रमण काडले. चौकशी केल्यास मुख्याधिकारी यांनी कागदपत्रात सर्व खोटी माहिती दिली.अतिक्रमण काडतांना एकूण खर्चनगर पालिका 1) प्रशासकीय अधिकारी/कर्मचारी यांचे वरील एकुण खर्च – 26833/-2) जे.सी.बी. खर्च – 4009 3) ट्रॅक्टर खर्च – 2000/-4) पोलिस बंदोबस्त खर्च4981/-एकुण रुपये – 37823/राष्ट्रीय राजमार्ग यांच्या कडुन कोणताही खर्च हिशोबात दाखविला नाही.. या प्रकरणात जिल्हाधिकारी कडे 3 दा चौकशी करण्याची मागणी केली.दुर्लक्ष होत असल्यामुळे नागपूर हिवाळी अधिवेशनात संबंधित अधिकारी कडे या प्रकरणात चौकशी करून नियमानुसार कार्यवाही करून दोषी अधिकारी यांना निलंबित करण्याची मागणी करणार असल्याची माहिती प्रतिनिधी यास दिली.अरविंद काळे प्रकल्प अधिकारी राष्ट्रीय राजमार्ग :- आम्ही हिंगणघाट नगर पालिकेला अतिक्रमण काढण्या संदर्भात पत्रव्यवहार केला नाही.आम्ही आमच्या दोन्ही बाजूला 30 मीटर हद्दीत येत असलेले अतिक्रमण आम्ही काडु. निलेश शिंदे (हिंगणघाट नगर पालिका प्रशासकीय अधिकारी ) :– हिंगणघाट नगर पालिका अधिकारी, कर्मचारी, हिंगणघाट पोलीस, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांची संयुक्त कार्यवाही नुसार अतिक्रमण काडले.

CLICK TO SHARE