रामाटोला येथे ४ दिवसीय अटल क्रीडा आणि सांकृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न

सोशल

प्रतिनिधी / सालेकसा

आज दिनांक ७ डिसेंबर २०२३ रोजी ग्राम रामाटोला येथे अटल क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद गोंदिया अंतर्गत रामाटोला केंद्राचे ४ दिवसीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आज पहिल्या दिवशी उद्घाटन समारोह पार पाडले. कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी जिल्हा परिषद सदस्य गीता ओमप्रकाश लिल्हारे मंचावर उपस्थित होते तर उद्घाटक म्हणून पंचायत समिती गट नेते जितेंद्र बल्हारे, दीप प्रज्वालक म्हणून पंचायत समिती सदस्य सुनिता राऊत, जिल्हा युवक कॉंग्रेस महासचिव ओमप्रकाश लिल्हारे, केंद्र प्रमुख नागपुरे मंचावर उपस्थित होते. विद्यार्थी घडविण्यासाठी शारीरिक स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्याक्रमे आयोजित करणे आवश्यक आहे. अश्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना चालना मिळते आणि भविष्यात कोणत्या दिशेने पुढे जाने आहे ते लक्षात येते. ग्रामीण क्षेत्रातील विद्यार्थी पुढे जावून पोलीस भरती, आर्मी भरती मध्ये सर्वाधिक असतात त्यामुळे असे क्रीडा स्पर्धा त्यांना शारीरिक विकासासाठी गरजेचे आहे असे विचार कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य गीता लिल्हारे यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता लांजेवार सर, जि. प. शाळा विचारपूर मुख्याध्यापक मैकलवार सर, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रामेश्वर लिल्हारे, शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमादरम्यान राजकुमार लिल्हारे, उत्तम लिल्हारे, सुरेंद्र पटले, भूमेश्वर बोपचे, गेंदलाल रत्नाकर, प्रेमलाल चौरके व इतर नागरिक आणि विद्यार्थी मोठ्या संखेने उपस्थित होते.

CLICK TO SHARE