गटविकास अधिकारी यांची आकस्मिक भेट

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनील हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर ग्रामपंचायत ला आज गटविकास अधिकारी यांनी आकस्मिक भेट देऊन गावातील सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन व इतर विकास कामांचे पाहणी केली. ग्रामपंचायत अल्लीपूर येथे अनेक विकास कामे झपाट्याने सुरू आहे त्यांची पाहणी करण्याकरता आज गटविकास अधिकारी अंजने यांनी आकस्मिक भेट देऊन सर्व विकास कामांची पाहणी केली. मोदी आवास योजना सांडपाणी घणकचरा व्यवस्थापण कामे, तालुका स्तरीय प्लास्टीक संकलण शेड, चारा लागवड, नागरी सुविधा बांधकामांना भेटी देऊन ग्रामपंचायत कामकाजाचा आढावा घेण्यात आला.

CLICK TO SHARE