तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक संपन्न

सोशल

प्रतिनिधी/सालेकसा

आज सालेकसा तालुका कॉंग्रेस कमिटीची आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय कॉंग्रेस कमिटी गोंदियाचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार मा. दिलीप बंसोड होते. सालेकसा तालुक्यातील सर्व बूथ निहाय समिती तयार करून बूथ प्रमुखांची जबाबदारी बाबत मार्गदर्शन केले. याशिवाय ११ डिसेंबर रोजी कॉंग्रेस पक्षातर्फे नागपूर येथील विधानभवनावर मोर्चा संबंधी रूपरेषा आखण्यात आली आणि नियोजन करण्यात आले. बैठकी दरम्यान जिल्हा अध्यक्ष दिलीप बंसोड यांच्या हस्ते काही पदाधिकाऱ्यांचे नियुक्ती सुद्धा करण्यात आली. तालुका महासचिव म्हणून ओमप्रकाश ठाकरे, सचिव पदी शैलेश बहेकार, तालुका प्रवक्ता पदी लखन अग्रवाल, तालुका प्रसिद्धी प्रमुख म्हणून रोहित बनोठे, जिल्हा परिषद झालीया समन्वयक पदावर जागेश्वर नागपुरे यांची नियुक्ती करण्यात आली. या निमित्त तालुका अध्यक्ष राजु दोनोडे यांनी सर्वांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमादरम्यान जिल्हाध्यक्ष दिलीप बंसोड, आमगाव देवरी विधानसभा समन्वयक गजानन झंझाड, सालेकसा तालुका अध्यक्ष राजु दोनोडे, आमगाव तालुका अध्यक्ष संजय बहेकार, तालुका महासचिव ओमप्रकाश ठाकरे, तीरखेडी जिल्हा परिषद सदस्य विमल कटरे, गट नेते जितेंद्र बल्हारे, ओबीसी आघाडी तालुका अध्यक्ष विजय फुंडे, युवा कॉंग्रेस जिल्हा महासचिव ओमप्रकाश लिल्हारे, तालुका सचिव शैलेश बहेकार, युवा कॉंग्रेस तालुका अध्यक्ष नितेश (लाला) शिवणकर, तालुका प्रवक्ता लखन अग्रवाल, जेष्ठ कार्यकर्ते यादनलाल बनोठे, जागेश्वर नागपुरे, राजेश अडमे, भारत लिल्हारे, गेंदलाल चौधरी, बंटी कटरे, तालुका प्रसिद्धी प्रमुख रोहित बनोठे, कॉंग्रेस व्यापारी संघटनेचे तालुका अध्यक्ष आशुतोष असाटी, मंगेश चुटे तालुक्यातील बूथ प्रमुख, ग्राम पंचायत सरपंच, उपसरपंच, सदस्य व इतर कॉंग्रेस पदाधिकारी मोठ्या संखेने उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन निर्दोष साखरे यांनी केले तर आभार सालेकसा तालुका अध्यक्ष राजु दोनोडे यांनी व्यक्त केले.

CLICK TO SHARE