पोलीस पाटील धरणे आंनदोलनात सहभागी

अन्य

प्रतीनीधी:साजिद खान नागपुर

काटोल:काटोल तालुक्यातील सर्व पोलीस पाटील यांनी विविध मागण्या पूर्ण व्हाव्या या करिता धरणे आंदोलन करून खालील मागण्या संदर्भात माननीय उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत माननीय उपमुख्यमंत्री त्याचा गृहमंत्री महाराष्ट्रराज्य माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठवले. मागण्या १) पोलीस पाटलांना २००००रु मानधन देण्याबाबत किंवा मिनिमम वेजेस किमान वेतन प्रमाणे मानधन मिळणे बाबत २) मानधन दर महिन्याला नियमित देण्याबाबत. ३) पोलीस पाटील रिक्त पदे त्वरित भरण्याबाबत. ४) ग्राम पोलीस अधिनियम १९६७ मध्ये दुरुस्ती करून अधिनियमाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. ५) ग्राम पोलीस अधिनियम १९६७ माझ्या दुरुस्ती सुधारणा करण्यासाठी दिनांक २८/०२/२०१९ मध्ये घटित करण्यात आलेल्या व दिनांक ०१/०३/२०१९ प्रोजेक्ट आयोजित केलेल्या बैठकीमध्ये उपसमितीने समिती स्थापन करण्यास मान्यता दिली त्या समितीत पोलीस पाटील संघटनेचे प्रतिनिधींना अशासकीय सदस्य म्हणून घेण्यात यावे (६) पोलीस पाटील कल्याण निधीत सुधारणा करून शासकीय कर्मचाऱ्यांच्याप्रमाणे डी सी पी एस लागू करून दरमाहा ५००रु यावी (७) पोलीस पाटलांनी त्यांच्या कुटुंबास आरोग्य दिनाच्या शासनाकडून लाभ देण्याबाबत ८) इंग्लिश पाटलांची तालुकास्तरावर जीआर प्रमाणे शासनामार्फत कार्यशाळा आयोजित करणे बाबत (९) सेवानिवृत्तीनंतर सेवानिवृत्ती मानधन पेन्शन मिळण्याबाबत (१०) पोलीस पाटील यांच्या शासनातर्फे आवश्यक असलेले रजिस्टर देण्यात यावे. या धरणे आंदोलन पुढील पोलीस पाटील यांनी सहभाग घेतला होता संजय ललुसरे अध्यक्ष, सुषमा मुसळे उपाध्यक्ष, राजूपंचभाई सचिव,रोशनी मोंढें कोषाध्यक्ष, सदस्य मयूर उताणे काटोल तालुका संघटना मंत्री ,अमोल गजभिये, सारंग पुणेवार ,शुभम वानखडे ,आसिफ शेख ,रुपेश देशभ्रतार, आशा लोधी, स्वप्नाली टेंभे ,हिम्मत नाकले ,ममता लुसरे, विशाखा सोमकुवर ,हेमंत हेलोंडे ,पुरुषोत्तम दुधकवडे, वामन वंजारी ,सीमा हेलोंढे, प्रभुदास दलाल, प्रशांत येवले, राजेंद्र मुरडिया ,रोशन वाघाडे, उज्वला डाहाट, वर्षा महंत, शिवास ढोंके ,मंजुषा गोतमारे ,हे सर्व उपस्थित होते.

CLICK TO SHARE