मृत मुलाच्या परिवाराला आमदार कोरोटे यांनी केली आर्थिक मदत व दिली संत्वना भेट

अन्य

कुणबीटोला (सोनपुरी) येथील अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाच्या परिवाराला आमदार कोरोटे यांनी दिली सांत्वना भेट,केली आर्थिक मदत

प्रतिनिधी / सालेकसा आकाश बावनकर

तालुक्यातील कुणबीटोला (सोनपुरी )येथील गुपचूप विक्रेता जागेश्वर विठोबा उईके वय 33 वर्ष यांचा दि.02/12/2023 ला आमगाव सालेकसा रोडवर अपघात झाला होता. त्या अपघातात उईके यांच्या निधन झालं होता. मृतकच्या परिवाराला आज आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे यांनी संत्वन भेट दिली. या भेटदरम्यान त्यांनी कुटुंबीयांना आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबीयांना पुढील कार्यास हातभार लावला. या भेटी दरम्यान पंचायत समिती सदस्य जितेंद्र बल्हारे, ग्राम पंचायत सोनपुरी सरपंच अरुण मच्छीरके, काँग्रेस कमिटी जिल्हा परिषद झालिया अध्यक्ष जागेश्वर नागपुरे, उपसरपंच उमेशजी चुटे, ग्राम पंचायत सदस्य जागेश्वर मच्छीरके, विजय लिल्हारे, अनुप चुटे, गौरी चुटे, भागचंद लिल्हारे, राकेश चुटे, धर्मराज चुटे, मुलचंद मच्छीरके इत्यादी मंडळी उपस्थित होते.

CLICK TO SHARE