मौका चौकशी अहवाल विषयाला धरून नाही, बोगस अहवाल विरोधात चौकशीची मागणी करणार विक्की कोटेवार

सोशल

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट :विक्की कोटेवार याने प्लॉट ची मोजणी चुकीची आहे या बद्दल तक्रार केली मौका चौकशीअहवाल मध्ये प्लॉट कुठून कुठ पर्यंत आहे हे दाखवायला पाहिजे होते. भूमी अभिलेख कडुन प्लॉट ची जागा, सर्विस रस्ता, हायवे ची हद्द लक्षात आली असती मौका चौकशी करतांना प्लॉट धारक, तक्रार धारक नगर पालिका अधिकारी, राष्ट्रीय राजमार्ग अधिकारी यांची उपस्थितीआवश्यक होती मौका चौकशीत दिलेली माहिती ही विषयाला धरून नाही दीशाभूल करणारी आहे.विजय गुणवंत वंजारे यांचे स.नं. ९०/१,२ मधील भुखंडाचे मोजणी मामला कमांक १९१/२०२३ मोजणी दिनांक २/८/२०२३ या मोजणीवर आपण मा. उपसंचालक भूमि अभिलेख, नागपुर प्रदेश, नागपूर यांचे कार्यालयात आक्षेप अर्ज दाखल केलेला आहे. सदर तक्रारीचे अनुषंगाने या कार्यालयाचे वतीने सदर प्रकरणात दिनांक १६/११/२०२३ ही तारीख निश्चित करण्यात आलेली होती. त्यानुसार या कार्यालयाचे कर्मचारी श्री. दे.रा. कोळेकर शिरस्तेदार व श्री. एस. एम. गौरखेडे प्रतिलिपी लिपीक यांनी सर्व हितसंबधीतास रितसर नोटीस तामिल करुन मौका चौकशी केली. सदर मोजणी मामला कमांक १९१/२०२३ चे प्रकरणानुसार मौका पहाणी केली असता मोजणी प्रकरणातील अ शीट मध्ये स.नं. ९०/१ मधील प्लॉट नं. २ लगत लाल रंगाने दर्शविल्याप्रमाणे आपल्या दुकानाचे शेड लगत हायवेच्या जागेत असल्याचे दिसुन येते. परंतु मौका चौकशीचे दिनांस आपले कोणत्याही प्रकारचे दुकानाचे शेड दिसुन आलेले नाही. सदर दुकानाचे शेड हे नगर परिषद हिंगणघाट व हाय-वे रोडचे प्राधिकरणाने चौकशीचे पुर्वीच हटविल्याचे दिसुन आले. आपले दुकानाचे शेड हे आपल्या मालकी हक्काचे जागेत नसुन ते हायवे(रोडच्या) जागेत होते, असे मोजणी प्रकरणावरुन दिसुन येत आहे. करीता आपला तक्रार अर्ज निकाली करणेकामी प्रस्तावित करण्यात येत आहे.

CLICK TO SHARE