विधान भवनावर विज कंत्राटी कामगारांनी व्यक्त केला आक्रोश

अन्य

तांत्रिक अप्रेंटिस कंत्राटी कामगार असोसिएशन आक्रमक

प्रतिनिधी:साजीद खान नागपुर

नागपुर : विज क्षेत्रातील कंत्राटी कामगारांचे ज्वलंत प्रश्न अनेक वर्षापासुन प्रलंबित आहेत. संघटनेने अनेक आंदोलनाच्या माध्यमातुन प्रलंबित प्रश्नाला वाचा फोडली आहे. तत्कालीन उर्जामंत्री महोदयांनी तात्काळ निर्णय घेवुन प्रश्न मार्गी लावण्याच आश्वासन दिले होते. शासन व प्रशासना सोबत अनेक वेळा चर्चा होवुन आश्वासित केलेले प्रश्न अद्याप पर्यंत मार्गी न लागल्यामुळे राज्यातील कंत्राटी कामगारांमध्ये प्रलंबित प्रश्ना बाबत प्रचंड असंतोष निर्माण झाला झाल्याने कंत्राटी कामगारांनी विधानभवनावर दि. 08 डिसेंबर 2023 रोजी आकोश व्यक्त आहे असल्याची माहीती तांत्रिक अप्रेंटिंस कंत्राटी कामगार असोसिएशन चे राज्य कार्याध्यक्ष विक्की कावळे व सरचिटणीस शेख राहील यांनी प्रसिध्द केलेल्या पत्रकात दिली आहे.तिन्ही कपंनीतील कंत्राटी कामगारांकरीता कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात यावी, कंत्राटी कामगारांना देण्यात येणारा 20 टक्के विशेष पुरक भत्त्यामध्ये वाढ करून 40 टक्के विशेष पुरक भत्ता देण्यात यावा, कंत्राटी कामगारांना नियमित विज कामगाराप्रमाणे गृप इन्शुरन्स कवच देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना नियमित विज कामगारांप्रमाणे अपघात विम्याचा लाभ देण्यात यावा, कंत्राटी कामगारांना ईतर राज्याप्रमाणे नियमित सेवेत कायम करण्यात यावे तसेच त्यांना आरक्षण देण्यात यावे, कंत्राटी कामगारांना रोजंदारी पध्दतीने कामावर घेवुन शाश्वत रोजगाराची हमी दयावी, महावितरण, महानिर्मीती, महापारेषण कंपनीमध्ये शिकाऊ उमेदवारी पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थी करीता तिन्ही कंपनीमध्ये चुतुर्थ श्रेणीतील सरळ सेवा भरती मध्ये 100 टक्के आरक्षण देण्यात यावे. तसेच रिक्त असलेल्या सर्व जागा भरण्यात याव्या शासनाने सरळ सेवा भरती करीता वयोमर्यादेमध्ये वाढ केली आहे. परंतु महावितरण कंपनीमध्ये अद्याप या बाबत काहीच कार्यवाही केली नाही. महावितरण सरळ सेवा भरती प्रकीयमध्ये वयोमर्यादा मध्ये वाढ करण्यात यावी, तिन्ही कंपनीतील कंत्राटी कामगारांनाकडुन कंत्राटदार मासिक वेतनामधुन रु 4000 ते 6000 ची मागणी केली जाते. पैसे परत न केल्यास त्यांना कामावरून कमी केल्या जात आहे. नियमाप्रमाणे वेतन फक्त कागदोपत्रीच दाखविल्या जाते. प्रत्येक्षात मात्र कंत्राटी कामगारांची आर्थीक पिळवणुक करण्यात येते, कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधनाचा पुरवठा करण्यात येत नाही. त्यांना सुरक्षा साधने पुरविण्यात यावे, महावितरण कंपनीतील तांत्रिक प्रर्वगातील तृतीय व चतुर्थ श्रेणीतील रिक्त असलेल्या पदावर कंत्राटी कामगार 95 टक्के व 85 टक्के भरणा केला जातो. सदरहू रिक्त असलेल्या पदाच्या 100 टक्के जागावर कंत्राटी कामगार भरती करण्यात यावी, वायरमन आय.टी.आय धारकांना महापारेषण कंपनीतील सरळ सेवा भरती मध्ये संधी देण्यात यावी.सदरहु आकोश धरणे आंदोलन तांत्रिक कामगार युनियन र.न.5059 चे केंद्रीय अध्यक्ष दिलीप कोरडे, बी.आर.पवार, सतिश भुजबळ, गोपाल गाडगे, सरचिटणीस प्रभाकर लहाने, नितीन चव्हाण, शिवाजी शिवनेचारी, संजय उगले, महेश हिवराळे, आनंद जगताप रघुनाथ लाड, प्रकाश निकम्, गजानन अघम,विकम चव्हाण, संजय पाडेकर, सुनिल सोनवणे, प्रकाश याघ, विवेक बोरकर, किरण कन्हाळे यांच्या मार्गदर्शनामध्ये करण्यात येणार आहे. यावेळी तांत्रिक कामगार युनियन चे सरचिटणीस तथा कंत्राटी कामगार असोसिएशनचे राज्याध्यक्ष प्रभाकर लहाने यांनी मनोगत व्यक्त करतांना राज्यशासनाच्या व प्रशासनाच्या धोरणाचा निषेध्द व्यक्त केला. कंत्राटी कामगारांना कायम करणे, त्यांना नियमित कामगारांप्रमाणे विमा सरंक्षण देणे, सरळ सेवा भरती मध्ये आरक्षण देणे, वयोमर्यादेमध्ये वाढ करणे, कन्याण मंडळाची स्थापना करणे, विशेष पुरक भत्यामध्ये 40 प्रलंबित प्रश्नामुळे कंत्राटी कामगारांमध्ये प्रचंड प्रमाणात असंतोष निर्माण टक्के वाढ करणे, शाश्वत रोजगारांची हमी देणे, वायरमन धारकांना महापारेषण कंपनीमध्ये भरती प्रकीयत संधी देण्यात यावी, कंत्राटी कामगारांना सुरक्षा साधन पुरवावे अशा मागण्या प्रलंबित आहेत हया सर्व मागण्या कंत्राटी कामगारांच्या आयुष्यावर परिणाम करणारे आहेत. शासन व प्रशासनाने त्वरीत दखल घेत प्रश्न निकाली काढण्यात यावे, प्रश्न निकाली न निघाल्यास कंत्राटी कामगार अधिक तिव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल अशा स्वरूपाचा ईशारा दिला. यावेळी विक्की कावळे, शेख राहील, अतुल, थेर, प्रमाद भालेराव आदीनी मनोगत व्यक्त केले.आंदोनामध्ये राज्यातील शेकडो कंत्राटी कामगार उपस्थित होते. आंदोलन यशस्वी करण्याकरीता विक्की कावळे, अनिल चव्हाण, विकास लांजेवार, अनिवेश देशमुख, कुणाल जिचकार, मयुर कोठे,तिलक भारती,निखिल बावनकुळे, पराग रेवतकर, राजू लाडे, पवन सौदागर, जयंत तुपकर,आकाश गुप्ता ,आदीनी प्रयत्न केले.

CLICK TO SHARE