भीमराया घे तुझ्या या लेकरांची वंदना

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

हिंगणघाट :-डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन संध्या,दि. ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:०० वाजताडॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या मागील परिसर येथे प्रथमता आयोजित केला होता. कार्यक्रमाची सुरुवात सुरेश गायकवाड मित्र परिवार यांनी मध्यरात्री बारा वाजता बाबासाहेबांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व मोमबत्ती प्रज्वलीत करुण श्रद्धांजली वाहिली.हा कार्यक्रम आयोजक सुरेश गायकवाड यांच्या संकल्पनेतून आणि संयोजक आदर्श महिला नागरी सह. पत संस्था,मर्या. हिंगणघाट यांचा सहकार्याने मागील वर्षापासुन आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे सादरीकरण महेश मुडे ,अंतर्नाद म्युझिकल गृप, हिंगणघाट तर्फे करण्यात आले यासाठी पाहुणे गायक म्हणून सा,रे,ग,म,प फेम दुर्वास करकाडे व मी होणार सुपरस्टार (स्टार प्रवाह फेम) मा. राहुल मोरे या युवा गायकांनी हजेरी लावली होती.यंदाच्या अवकाळी पावसामुळे अभिवादन संध्या हा कार्यक्रम दीवसावर KGN सभागृह येथे स्थलांतरित करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात बाबासाहेबांच्या प्रतिमेला व बुध्दमुर्तीला प्रा.अस्मिताताई भगत (दारोंडे), मा.अनुताई सोनकुवर, मा. संध्याताई जगताप, मा. अश्विनीताई पाटील, आरतीताई गायकवाड,तेजस्विनीताई पाटील, यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व पुष्पहार वाहून करण्यात आली .. त्यानंतर अभिवादन संध्याला”नमस्कार घ्यावा अहो बुद्ध देवा” या प्रथम बुद्धगिताने सुरुवात झाली, एकापाठोपाठ एक अश्या अनेक भीमगीतांच्या माध्यमातून भीम अनुयायांना बाबासाहेबांचा जीवनपट नव्यानं अनुभवता आला. श्रध्दांजलीपर भीमगीताने सभागृहातील वातावरण काही काळ बाबासाहेबांचा महापरिनिर्वाण दीन डोळ्यासमोर आठवुन सर्वत्र भयाण शांतता पसरली होती. त्यानंतर महेश मुडे यांनी प्रबोधनातून अनुयायांना सावरण्याचा प्रयत्न करुन सा,रे,ग,म,प फेम गायक दुर्वास करकाडे यांचे सोबत मी होणार सुपरस्टार, (स्टार प्रवाह फेम) गायक मा.राहुल मोरे यांनी आपल्या गोड गळ्यातील स्वरांना उपस्थितांच्या काणी पोहचवून मंत्रमुग्ध केले. या अभिवादन संध्येला यशस्वीरित्या पार पडण्यासाठी आयोजक सुरेश गायकवाड यांनी हिंगणघाटातील समस्त भीम अनुयायांचे व आदर्श महिला नागरी सह. पत संस्था, मर्या. हिंगणघाट यांचे आभार मानले व दरवर्षी अशीच साथ कायम राहणार ही अपेक्षा जाहीर केली .. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडण्यासाठी शुभम कोंडागुर्ले, कवी रसपालजी शेंद्रे, अमित सोगे, मनीश सुनानी, विक्की गायकवाड, अभिमन्यू मकरे, भीमा गायकवाड, निखिल उमरे, अमित दुर्गे, निक्कु रामटेके ,अविनाश झाडे, शुभम मुंजेवार, समिरजी भोसले, व इत्यादी यांनी परिश्रम करून कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न पार पाडला.

CLICK TO SHARE