तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनी मध्ये ज्ञानदिप विद्यानिकेतन चे सुयश

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

जिल्हा परीषदेच्या शिक्षण विभागाकडून तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दि.४ व ५ डिसेंबर ला स्थानिक आगरकर विद्या भवन या शाळेत करण्यात आले होते. सदर प्रदर्शनीमध्ये हिंगणघाट तालुक्यातील विविध शाळांनी सहभाग घेतला होता.त्यात ज्ञानदिप विद्यानिकेतन हिंगणघाट येथील इयत्ता ९ वी मधील विद्यार्थी मंथन खौट ,मृदूल सोरटे व निल गाखरे यांनी तयार केलेल्या “यंत्रमानवाव्दारे नदीची स्वच्छता व इतरही स्वच्छता” या प्रतिकृतीस व्दितीय क्रमांक प्राप्त झाला. त्यांना आ.रामदासजी आंबटकर यांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले. विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षक भुषण रघाटाटे व शिल्पा जैस्वाल यांचे विशेष मार्गदर्शन लाभले .जिल्हास्तरावर निवड झाल्याबद्दल संस्था संस्थापक गिरधरजी राठी ,अध्यक्षा .अर्पणा राठी ,सदस्य .रशेष राठी ,मुख्याध्यापक .अतुल सक्सेना व सर्व शिक्षकवृंदांनी विजेत्यांचे कौतुक केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

CLICK TO SHARE