मुंबईत झालेल्या टॅलेंट रनवे सीझन २ मध्ये हिंगणघाट ची श्रृती दुधलकर सोरटे बेस्ट फॅशन रनवे कोरियोग्राफर – ग्रूमर या पुरस्काराने सन्मानित.

अन्य

३ डिसेंबर रोजी टॅलेंट फूल ऑन चे संचालक अभिषेक सुमन, ४० आर टी एफ मीडिया आणि सुप्रसिध्द फॅशन डिझायनर स्वाती सिन्हा यांच्या द्वारे टॅलेंट रनवे सीझन २ चे आयोजन ग्रीन विलेज रिसॉर्ट मालाड मुंबई येथे करण्यात आले. या कार्यक्रमात संपूर्ण भारतभरातून ऑडिशन द्वारा मिस, मिस्टर, मिसेस आणि किड्स या कॅटेगरी मधून अंतिम फेरी करता सर्वोत्तम स्पर्धक निवडले गेले. या स्पर्धकांचे ग्रूमिंग, व्यक्तिमत्त्व विकास मार्गदर्शन आणि रॅम्प वॉक कोरिओग्राफी ची जवाबदारी समर्था इव्हेंट अँड सिने प्रोडक्शन च्या संचालिका आणि मिसेस इंडिया २०१८ च्या फर्स्ट रनर अप श्रृती दुधलकर सोरटे यांनी पार पाडली. या कामगिरी करता त्यांना सुप्रसिध्द संगित निर्देशक – गायक अरविंदर सिंह यांच्या हस्ते मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सदर कार्यक्रमात टीव्ही आणि चित्रपट जगतातील नामवंत कलाकारांची उपस्थिती लाभली. यात अभिनेत्री विविधा किर्ती, पारुल चौधरी, अंजली उजवने, अभिनेते करण शर्मा, मजिंदर करीर सुप्रसिध्द गायक – संगीतकार अरविंदर सिंह, संगीतकार के आर वाही, गायक अभिषेक राजपूत, इत्यादी कलाकार उपस्थित होते. श्रृती स्थानिक महाविद्यालयात वाणिज्य शाखेत प्राध्यापक असून विधी सल्हागार म्हणून पण कार्यरत आहे. तसेच त्या अनेक सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमात जुळल्या असून विद्यार्थी आणि स्त्रियां करता विविध क्षेत्रात निरंतर कार्यरत आहेत. या सोबतच त्या नृत्य दिग्दर्शन, अभिनय, नाटक, निर्देशक, रॅम्प वॉक कोरिओग्राफर, मॉडेलिंग, वक्तृत्व कला, व्यक्तिमत्त्व विकास कौशल्य, संचालन कला, शैक्षणिक उपक्रम, इत्यादी क्षेत्रात त्यांची आवड असून त्या या क्षेत्रात देखील कार्यरत आहेत.या पुरस्काराकरता त्यांनी टॅलेंट रनवे सीझन २ चे संचालक अभिषेक सुमन आणि स्वाती सिन्हा यांचे आभार व्यक्त करून संपूर्ण भारतातील प्रतिभावान कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत इतका सुंदर उपक्रम घेण्या करता त्यांचे अभिनंदन केले आहे.

CLICK TO SHARE