कार्तीक महोत्सव रथयात्रेची सांगता ढोल ताशांचा गजर गावातील मार्गाने निघाली मिरवणूक

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

सद्गुरू आबाजी महाराज देवस्थान कमेटीद्वारे सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कार्तीक उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला गावात यात्रेसाठी पंचक्रोशीतील हजारो भावीक भक्तांची गर्दी उसळली होती. मागील अनेक वर्षा पासुन हि परंपरा कायम असुन भावीक भक्तांनी याचा आनंद घेतात. अल्लीपुर येथे दरवर्षी आबाजी महाराज कार्तीक महोत्सव मोठया उत्साहात साजरा होतो. रथयात्रा महोत्सव का जील्हयात प्रशीद्ध आहे या दरम्यान गावात दहीहांडीच्या दिवशी सागापासून तयार केलेल्या तीन मजली रथ बाहेर काढुन त्याला तेलपानी लाऊन फुलांनी सजविण्यात आला होता आबाजी महाराजांची पालखी तसेच नगाजी महाराजांची पालखी ढोलताशांच्या गजरात रथयात्रा मिरवणूक प्रमुख मार्गाने काढण्यात आली भजनी मंडळाद्वारे मंदीर ते आठवडी बाजार, येथील दिपमाळावर नेऊन दहीहांडी फोडुन रथयात्रेची सांगता करण्यात आली. कागदी तावापासून तयार केलेले दुबारे हवेत उडविण्यात आले कोणतीही अपरीचीत घटना घडू नये म्हणून पोलीस निरीक्षक प्रफुल डाहुले यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता यावेळी सरपंच नितीन चंदनखेडे, उपसरपंच विजय कवडे, पुरुषत्तम वराडे, बाबाराव झींगरे यांच्यासह कमेटी सदस्य व भावीक भक्तांनी रथाचे पूजन केले.

CLICK TO SHARE