वाहनाच्या धडकेने वाघिणीचा मृत्यू

सोशल

प्रतिनिधी :- शारुखखान पठाण वरोरा

चंद्रपूर- वरोरा तालुक्यातील खांबाडा ते नागरी या मार्गावर असलेल्या वडगाव मुरद गाव येथील नाल्यामध्ये आज दिनांक १० डिसेंबर रोजी दुपारच्या सुमारास एका तीन वर्षे वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकिस आली खांबाडा- नागरी या मार्गावर असलेल्या मुरदगाव या गावाजवळ असलेल्या नाल्यामध्ये एका तीन वर्षे वाघिणीचा मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली, दुपारी दीड वाजताच्या सुमानास येथील नागरिकांनी वनविभागाचे वनसंरक्षक अधिकारी सतीश शेंडे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली, घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन वनविभागाचे अधिकारी तथा कर्मचारी यांनी याची माहिती वरिष्ठ अधिकारी चंद्रपूर यांना दिली, घटनेची माहिती कळतात त्वरित घटनास्थळ गाठून वन कर्मचाऱ्यांनी नाल्यात पडलेल्या वाघिणीला उचलून जेव्हा विच्छेदनासाठी दुपारी साडे तीन वाजताच्या सुमारास वन्यजीव उपचार केंद्र, चंद्रपूर येथे पाठविण्यात आले यावेळी सतीश शेंडे आर. एफ. ओ वरोरा, नायगमकर साहेब सहाय्यक वनसंरक्षक, बंडू धोत्रे, मुकेश भांदककर् एनजीओ ,कर्मचारी उपस्थित होते .

CLICK TO SHARE