जी बी एम एम कनिष्ठ महाविद्यालय येथे भाषा कौशल्य विकसन उपक्रम अंतर्गत अतिथी व्याख्यान संपन्न

सोशल

प्रतिनिधी :आसिफ मलनस (हिंगणघाट )

हिंगणघाट :शालेय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थांना भाषेविषयी आवड निर्माण व्हावी व व्यवसाय मार्गदर्शन मिळावा या उद्देशानी व्यवसाय शिक्षक, कला शिक्षक व भाषा शिक्षक यांच्या संयुक्त विद्यमाने अतिथी व्याख्यान चे आयोजन करण्यात आले. या साठी महाविद्यालयातील माजी विध्यार्थिनी प्रा श्रुती सोरटे सहाय्यक प्राध्यापक, आर एस बिडकर कॉलेज हिंगणघाट यांना आमंत्रित करण्यात आले. प्रा. श्रुती सोरटे यांनी आपल्या ज्ञान व उत्कृष्ठ शैलीने विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी सुद्धा प्रतिसाद दिला व आपल्या शंकेचे निरसन करून घेतले व प्रश्नांना सोडवून घेतले.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य श्री सुनील फुटाणे सर तसेच प्रमुख पाहुणे म्हुणुन प्रा दिवटे व प्रा ठाकडा मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ अनिस बेग यांनी केले. व संचालन विद्यार्थिनी कु. चारभे व आभार प्रदर्शन 11 वी ब चा विद्यार्थी बालपांडे यांनी केले. प्राचार्य श्री फुटाणे सर यांनी अध्यक्षीय भाषणात कार्यक्रमाचे महत्व व यशस्वीते बद्दल आपल्या प्रभावी शैलीत मनोगत व्यक्त केले. व्यावसायिक शाखेच्या व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थी यांनी कार्यक्रमाचा लाभ घेतला. व असेच कार्यक्रम व्हावे असे मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्राचार्य व शिक्षक यांच्या तर्फे प्रा श्रुती यांना प्रमाणपत्र व भारतीय राज्यघटना पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कला शिक्षक श्री किशोर उकेकर, व्यवसाय शिक्षक त्रिरत्न नागदेवे, सर्व भाषा शिक्षक, डॉ अनिस बेग, सोनकुसरे मॅडम व कडू मॅडम यांनी मोलाचे कार्य केले.

CLICK TO SHARE