आंबेडकर जन मोर्चा संघटनेच्या मराठवाडा अध्यक्षपदी अशोक इंगोले व भीमराव दिपके यांची मराठवाडा सचिवपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार.

सोशल

हिंगोली (प्रतिनिधी) अशोक इंगोले

वसमत:आंबेडकर जन मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास मस्के यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र प्रदेश सचिव,संगीता धारबा इंगोले, मराठवाडा अध्यक्ष अशोक इंगोले, रमेश कांबळे जिल्हाध्यक्ष, बेबीनंदा भिसे हिंगोली जिल्हा महिला अध्यक्ष, आंबेडकर जन मोर्चा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. अशोक इंगोले व भीमराव दिपके यांचा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष विलास मस्के यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देऊन त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक बबन दिपके यांनी करून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. कार्यक्रमासाठी गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. भीमराव दिपके यांची निवड झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

CLICK TO SHARE