माऊली समाधी सोहळा

सोशल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

हिंगणघाट तालुक्यातील सिरसगाव (बाजार) येथील राधा कृष्ण देवस्थानाच्या वतीने माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधी सोहळ्यानिमित्त श्रीमद भागवत सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. त्या निमित्याने भागवत प्रवक्ते ह. भ. प. गजानन महाराज टोम्पे यांनी आजच्या समाजाला तसेच भरकटलेल्या तरुणांना मार्ग दाखविण्यासाठी भागवतगिता हा ग्रंथ मोलाचा ठरणार असुन त्या निमित्याने आजचा युवावर्ग थोड़ा का होईना मार्गावर येत असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी त्यांना साथ गायक व गावकरी तसेच उपस्थितांचे शब्दरूपी मनोविश्लेषण केले.

CLICK TO SHARE