ग्रा.प.पीपरिया येथे मनरेगा कामाला सुरुवात

अन्य

प्रतिनिधी / सालेकसा

ग्रामपंचायत पिपरिया अंतर्गत ग्राम गल्लाटोला येथे मनरेगा अंतर्गत पांधन रस्ता दुरुस्तीचे कामाला सुरुवात करण्यात आली. कामाचे भूमिपूजन जिल्हा परिषद सदस्य गीताताई लिल्हारे, पंचायत समिती गटनेता जितेंद्र बल्हारे, जिल्हा युवक काँग्रेस महासचिव ओमप्रकाश लील्हारे, ग्रामपंचायत सरपंच अनिल सोय्याम यांच्या हस्ते करण्यात आले. तालुक्यातील दिवाळी नंतर पहिल्यांदाच मनरेगा कामाला सुरुवात झाल्याने ग्रामीण नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण बघावयास मिळते. मनरेगा अंतर्गत कामाला तात्काळ सुरुवात करण्यात यावे याकरिता स्थानिक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी वारंवार मागणी केल्यावर कामाला सुरुवात झाल्याने मागणीला यश मिळाले असून नागरिकांना रोजगाराचे साधन उपलब्ध झाले असल्याचे काँग्रेस कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गणराज कोरोटे, मोतीलाल चौधरी, नरेंद्र कोरोटे, रवींद्र कोरोटे, अशोक उईके, सामाजिक कार्यकर्ता प्रल्हाद बरेकर, व्यंकटराव कोंबे, गेंदलाल चौधरी, महारू भूरकुडे, गोविंदा कोरोटे, तुकाराम लिल्हारे, प्रदीप चौरागडे, हुकुमचंद मत्तारे, केवलचंद कोरोटे, अमरलाल भोयर इत्यादी मंडळी उपस्थित होते.

CLICK TO SHARE