कुरुंदा येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ, पालखी मिरवणूक भागवत नगर प्रदक्षणा सोहळा संपन्न

अन्य

अशोक इंगोले (प्रतिनिधी हिंगोली)

वसमत तालुक्यातील कुरुंदा येथे दिनांक सहा डिसेंबर पासून भव्य असे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ कार्यक्रमाचे आयोजन श्री अष्ट महालक्ष्मी माता मंदिर परिसर श्रीक्षेत्र दुर्गामाता व हनुमान मंदिर परिसरात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.हा भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा सहा तारखेपासून ते १२ डिसेंबर पर्यंत मोठ्या संख्येने भाविकांच्या व महिला भगिनींच्या उपस्थितीत पार पडला,यामध्ये सप्ताहातील सत्संग पर्वणी परमपूज्य राम शरणदासजी महाराज राम मंदिर नांदेड, आत्मानंद गिरी गुरु सागर गिरी महाराज गांगलवाडी, श्री. ष.ब्र.वेदांताचार्य दिगंबर शिवाचार्य महाराज थोरला मठ वसमत, श्री. ष ब्र.गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज मठ संस्थान गिरगाव,श्री.ष.ब्र.प्रभूलिंग शिवाचार्य महाराज सारंग स्वामी शिरड शहापूर,श्री.ष.ब्र.108 मधुकर शिवलिंग शिवाचार्य महाराज मुदखेड, परम पूज्य श्री बालयोगी व्यंकट स्वामी महाराज मठ पिंपळगाव,व भागवताचार्य हरि भक्त पारायण गजानन महाराज शहापूर परभणीकरयांच्या विचार श्रेणी व मार्गदर्शक प्रेरणेतून भाविक भाविकांना प्रेरणा मिळाली.तसेच या कार्यक्रमा साठी कीर्तनकारणे देखील कीर्तनाच्या माध्यमातून भागवत कथा ज्ञानयज्ञ यांचं महत्त्व्त्व पटवून दिलं,यावेळी कीर्तनकार शि.भ.प.सौ.ज्योतीताई रवींद्र स्वामी ( चाभरेकर ) ह.भ.प.शिवाजी महाराज( पिंपराळेकर ) शि.भ.प.नागेश स्वामी कुरुंदवाडीकर, ह.भ.प.गजानन महाराज शहापूरकर,शि.भ.प.बालाजीराव पोटजाळे काकांडीकर, ह.भ.प.वीरा की मूर्ती कागदे बापू उमरीकर,व तसेच शि.भ.प.राजेस्वर महाराज लाहीकरयांच्या मधुर वाणी कीर्तनातून कीर्तनकारांनी श्रीमद् भागवत कथेचं व ज्ञानयज्ञ च महत्त्व यावेळी भाविकांना त्यांच्या विचारातून त्यांच्या वाणीतून त्यांच्या अंगीकृत असलेल्या कलेतून पटवून दिलं.तर आज 11 डिसेंबर रोजी अष्ट महालक्ष्मी माता मंदिर श्रीक्षेत्र दुर्गामाता व हनुमानन मंदिर परिसरातून पालखीचे व भागवत नगर प्रदक्षणा यांची टाळ मृदंग ढोल ताशे अशी भव्य मिरवणूक कुरुंदा नगरीतून मोठ्या संख्येने भाविक व महिला भगिनींच्या भजनी मंडळ यांच्या भक्तीमय हर्ष उल्हास वातावरणात मिरवणूक भव्य दिव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.यावेळी कुरुंदा येथील सदा अग्रेसर कार्यात असलेले कोणत्याही समय धावून येणारे सर्व मित्र मंडळांनी व पंचक्रोशीत समस्त गावकरी मंडळ,भाविक व महिला भगिनींनी आणि तरुण युवक युवकांनी प्रतिष्ठित नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले व हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला.

CLICK TO SHARE