आरटीओ विभागाने वाहन धारकांची पिळवणूक थांबवावी,अन्यथा आमरण उपोषण,विल्सन मोखाडे आता येणार अधिकारी वठणीवर

अन्य

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

वर्धा उप प्रादेशिक परिवहन विभागात वरिष्ठांच्या आदेशानुसार दररोज नवनवीन नियम लागू केल्याने वाहन धारक अडचणीत आला आहे. विभागाने वाहन धारकांची पिळवणूक त्वरित थांबवावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांनी दिलेल्या निवेदनातून केली असून, मागण्या मान्य न झाल्यास आमरण उपोषण करण्यात येणार असा इशारा सुद्धा विभागाला देण्यात आला आहे.परिवहन विभागाने मोठ्या प्रमाणावर शुल्क वाढ केली असल्याने,वाहन धारकांचे कंबरडे मोडले गेले आहेत.१५ वर्ष जुन्या वाहनांची मुदत वाढविण्यासाठी आधी कागदपत्रे ऑनलाइन करणे गरजेचे असल्याने ते काम करण्यासाठी कार्यालयात गेल्यानंतर ते काम वेळेत केल्या जात नाही.अशा अनेक प्रकारचे कामे घेऊन जाणाऱ्या वाहन धारकांना कार्यालय परिसरात कामे करून घेण्यासाठी ताटकाळत बसावे लागते. आरटीओ कार्यालयात वेळेत काम होत नसल्याच्या तक्रारी सामाजिक कार्यकर्ते विल्सन मोखाडे यांचे कडे प्राप्त झाल्यानंतर माहिती जाणून घेतली असता,उत्तरे देण्यात आली नाही. अखेर आरटीओ विभागाने वाहन धारकांचे कंबरडे मोडू नये त्यांचे प्रलंबित असलेले कामे त्वरित निकाली काढावे अन्यथा आमरण उपोषण करण्यात येणार अशी मागणी दिलेल्या निवेदनातून केली आहे.

CLICK TO SHARE