वाशीम,यवतमाळच्या पुरुष गटाने मारली बाजी राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा

अन्य

चंद्रपूरच्या महिला आणि अकोल्याचा बाल गट अव्वल

तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर

गुरुदेव मंडळ व परिवर्तन युवा मंडळाच्यावतीने राज्यस्तरीय खंजिरी भजन स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. चार दिवसीय या खंजिरी स्पर्धेत राज्यातील विविध भागातून ८४ भजन मंडळे सहभागी झाले होते. राष्ट्रसंतांच्या भजनावर ही स्पर्धा आयोजित होती. त्या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.या स्पर्धेत पुरुष गट ग्रामीण यात वाशीम जिल्ह्यातील आसोला येथील पितांबर महाराज भजन मंडळाने बाजी मारली. तर शहरी गटात यवतमाळ येथील स्वार्थक भजन मंडळ हस्थापूर याने बाजी मारली. महिला गटात चंद्रपूर जिल्ह्यातील चनका येथील क्रांतिज्योती महिला भजन मंडळाने विजय मिळविला.बालक गटात अकोला येथील मंडळाने पारितोषिक पटकावले. या व्यतिरिक्त इतर पारितोषिकांचेही वितरण करण्यात आले. सहभागी सर्व मंडळांना बक्षीस, सन्मान चिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. तसेच बाहेर गावावरून आलेल्या सर्वच मंडळांना एक हजार रुपये मानधन देण्यात आले. बक्षीसवितरण कार्यक्रमाला कैलास बाळबुधे, गोपाल मेंघरे, उमेश कापकर, विवेक लिचडे, संदीप नरड, रामप्यारा कामडी, सुधाकर ढोबळे, परेश सावरकर, अरविंद साखरकर, गौरव लिचडे व आयोजन मंडळांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. गुरुदेव जयघोष करीत यशस्वी भजन स्पर्धेची सांगता करण्यात आली.

CLICK TO SHARE