शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करा अशी मागणी मनसे कडून करण्यात आली

सोशल

तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना मनसे कडून निवेदन देण्यात आले

प्रतिनिधी:साजिद खान नागपुर

भंडारा:पवनी येथील मनसे चे भोजराज कांबळी यांनी नायब तहसीलदार मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन सादर केलं असून त्या निवेदन द्वारे गेल्या तीन वर्षापासून शेतकऱ्यांचे सात बारा वर सोसायटी कर्ज किव्वा शेतीसाठी कर्ज घेतला परंतु उत्पन्न कमी झाल्या मुळे आणि महागाई मुळे शेतकऱ्याचे कर्ज परत फेड करण्यात आले नाही तर मुलांचे शिक्षण किव्वा शेतीसाठी लागणारा खर्च यांच्या कर्जाची परतफेड करण्यात आली नाहीनव्याने कर्ज घेण्यासाठी बँक किव्वा सोसायटी मध्ये गेले असता सोसायटी किव्वा बँक पाहिले अगोदरचे थकीत कर्ज भरा त्या नंतर नवीन कर्जाची मागणी करा अन्यथा आपल्यावर जप्तीची कार्यवही करण्यात येईल असे शेतकऱ्यांना नोटीस दिले जात आहे अश्या नोटीस मुळे शेतकऱ्यांची मानसिकता बिघडून आत्महत्या करू नये म्हणून थकीत कर्जदरांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करण्यात यावा अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पवनी तर्फे कण्यात आलीव मनसे तर्फे निवेदन देण्यात आले व शेतकऱ्यांचा या गंभीर प्रश्नावर नायब तहसीलदार आणि मनसे चे पदाधिकारी यांनी बसून थोडा वेळ चर्चा केली यावेळी उपस्थित मनसे कार्यकर्ते भोजराज कांबळी.संजय पुरी वैकुंठे धनराज उपरीकर,राकेश आकरे,किशोर,बारसागडे सचिव प्रशात उरकुडकर, डॉ.भावेश बावनकर, कुलदीप धकाते,प्रफुल ढेगरे विश्वेस्वर मालोडे नुतन वाढई व्यापारी इन संघटना तुणाल लांजेवार,पारस खोब्रागडे,सचिन चव्हाण,राकेश कांबळी प्रमोद सेलोकर,मिथून सेलोकर गजानन कांबळी आदी मनसेचे पवनी तालुक्यातील व शहरातील मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE