तलाठी सज्जा डिग्रस वाणी तालुका जिल्हा हिंगोली मधील मौजे लोहरा येथील गट क्रमांक 43 मधील आदिवासी अधिकारातील खोट्या खरेदीखत (रजिस्ट्री) तसेच फेरफार केल्याप्रकरणी

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली.

तलाठी सज्या डिग्रस वाणी तालुका जिल्हा हिंगोली मधील मौजे लोहरा येथील गट क्रमांक 43 मधील आदिवासी अधिकारातील खोटया खरेदीखत (रजिस्ट़ी) तसेच फेरफार केल्याप्रकरणीसंबंधित तत्कालीन मंडळ अधिकारी आयुब स.रसूल व तलाठी वामन राठोड यांचे सखोल चौकशी करून निलंबनाची कारवाई करणे या मागणी संदर्भात तसेच हिंगोली जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांच्या विविध योजनेचा लाभ दिव्यांगाना मिळण्याकरिता व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मार्फत दिव्यांग 5% निधी पूर्णपणे वाटप न केल्यामुळे तसेच अपंग पुनर्वसन केंद्र चालक विजय कान्हेकर यांच्या कामाची सखोल चौकशी न केल्यामुळे दिनांक 18/12/2023 वार सोमवार रोजी विभागीय आयुक्त कार्याल यासमोर छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) या ठिकाणी भीक मागो आंदोलन ठेवण्यात आलेले आहे.आंदोलनाचा दिनांक 18.12.23आंदोलनाचे ठिकाण :विभागीय आयुक्त कार्यालया समोर .छ.संभाजीनगर.आंदोलनाचे स्वरुप :भिक मागो आंदोलन निवेदक : रवि ऊर्फ रॉबर्ट बांगर जिल्हाध्यक्ष हिंगोली , विलास दादारावजी आघाव जिल्हा संघटककिशन मुटकुळे वरिष्ठ दिव्यांग सामाजिक नेते.सचिन परळकर जि.संपर्कप्रमुख प्र.अ.क्रांती, आंदोलनप्रदीप वानरे.जिल्हाध्यक्ष प्र.अ.क्रांती आंदोलन.हनुमान टेकाळे तालुका अध्यक्ष हिंगोली.प्र.अ.क्रांती आंदोलनवरील सर्व बाबी लक्षात घेऊन , संबंधित अधिकारी व तसेच दिव्यांग पुर्नवसन केंद्र चालक विजय कान्हेकर यांची वरिष्ठ स्तरावर सखोल चौकशी करुन दोषी आढळल्यास .योग्य ती न्यायालयीन दंडात्मक कारवाई करावी.अन्यथा प्रहार जनशक्ती पक्षातर्फे तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

CLICK TO SHARE