मौका चौकशी अहवाल चुकीचा आहे संबंधित याच्या उपस्थितीमध्ये मोजणी करावी विक्की कोटेवार याने केली मागणी

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे हिंगणघाट

मौजा शहालंगडी सर्वे नं 90/1 प्लॉट नं 2 प्लॉट मोजणी दी 16-11-2023 ला मौका चौकशीअहवाल विषयाला धरून नाही तसेच या प्रकरणाशी सबंधित प्लॉट धारक,नगर पालिका प्रतिनिधी, राष्ट्रीय राजमार्ग प्रतिनिधी, तक्रार दार यांच्या उपस्थिती मध्ये प्लॉट ची मोजणी आवश्यक होती. या पैकी ज्यांचा या विषयाशी संबंध नाही यांच्या उपस्थिती मध्ये मौका चौकशी करून अहवाल केला. तक्रारदार व सबंधित या पैकी जागेवर कोणीही नसतांना मौका चौकशी करण्यात आली. केलेली मौका चौकशी नियमानुसार केली नाही. सर्वांच्या उपस्थिती व नियमानुसार प्लॉट मोजणी करण्यात यावी सबंधित अर्ज दी.13/12/2023 ला हिंगणघाट उपअधिक्षक भूमी अभिलेख कार्यालय येथे पत्राद्वारे करण्यात आली.

CLICK TO SHARE