शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे खेचून आणल्याने आ. कुणावार यांचा निसर्गसाथीने केला सन्मान…

सोशल

प्रतिनिधी :करीम खान पठाण (हिंगणघाट )

हिंगणघाट दि.३१ डिसेंबर विधानसभा क्षेत्राचे कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांनी विशेष प्रयत्न करून वर्धा जिल्ह्यात होऊ घातलेले शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथेच व्हावे यासाठी शासन स्तरावर मंजुरी मिळविली आहे. नवे वैद्यकीय महाविद्यालय हिंगणघाट येथे सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला असून अनेक संस्था संघटनांच्यावतीने कार्यसम्राट आमदार समीर कुणावार यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. आज दि.३१ डिसेंबर २०२३ रोजी निसर्गसाथी फाउंडेशनच्यावतीने आमदार समिर कुणावार यांचा पुष्पहार अर्पण करुन सत्कार करीत मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले. याप्रसंगी निसर्गसाथी फाउंडेशनचे अध्यक्ष पक्षीमित्र प्रविण कडू, दैनिक सकाळचे बातमीदार प्रा. प्रभाकर कोळसे सर, निसर्गसाथीचे प्रा. अभिजित डाखोरे, प्रा. सौ. सुलभा कडू, नियाजुद्दीन सिद्दिकी , राजश्री विरुळकर,यशवंत गडवार, चैतन्य वावधने,प्रशांत हिवंज इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

CLICK TO SHARE