विसापुर येथे भूमिगत कोळसा खाणी ला विरोध : वेकोलि खाणची मागणीजिल्हा प्रतिनिधी:मोहम्मद नासीर चंद्रपूर बल्लारपूर : केंद्र सरकारने प्रस्तावित भिवकुंड कोल ब्लॉकभूमिगत कोळसा खाणीसाठी विसापूर व नांदगाव पोडे येथील ८०२ हेक्टर क्षेत्रात मे.सन्फ्लॅग आयर्न अँड स्टील लिमिटेडला मंजुरी दिली होती. या प्रस्तावित प्रकल्प स्थळावर बुधवारी सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने जनसुनावणी घेतली.या सुनावणीत विसापूर व नांदगाव पोडे येथील शेतकऱ्यांनीखासगीऐवजी वेकोलिची खाण हवी, अशी भूमिका मांडली. यावेळी जनसुनावणीकरिता निवासी उपजिल्हाधिकारी संजय पवार, पर्यावरण अधिकारी तानाजी जाधव व सहाय्यक पर्यावरण अधिकारी ड.भ.भादुले नागरिकांच्या मुद्द्यांची नोंद घेतली.जनसुनावणीला राजकीय नेत्यांनी आवर्जून उपस्थिती दर्शविली होती. या सुनावणीत कंपनीचे प्रतिनिधी मुख्य सल्लागार माईन्स डॉ. गणेश मानेकर यांनी कंपनीच्या वतीने प्रदूषणासंदर्भातील मुद्द्यांवर उपाय योजना व आणि स्थानिक ९०० बेरोजगारांना रोजगार संदर्भात भूमिका मांडली. शेतकऱ्यांनी भूमिगत कोळसा खाण झाल्यास पाण्याची पातळी कमी होणे, जमिनीतील रासायनिक द्रव्य बाहेर आल्याने होणारे दुष्परिणाम व धुळीमुळे होणारी नापिकी याकडे लक्ष वेधले. यावेळी कंपनीच्या बाजुने मुद्यांचे निवारण केले जात होते. अनेक राजकीय पक्षांचे पुढारी उपस्थित होते. त्यांनी आपल्या पक्षांची भूमिका मांडली. यावेळी अनुचित घटना घडू नये म्हणून बल्लारपूरचे ठाणेदार पी आय आसिफ राजा शेख यांच्या नेतृत्वात पोलिस बंदोबस्त होता. काही शाब्दिक वाद वगळता सुनावणी शांततेत पार पडली.सुनावणीला विसापूरचे सरपंच वर्षा कुळमेथे, उपसरपंच अनेकश्वर मेश्राम, छ. शिवाजी महाराज समितीचे अध्यक्ष बंडू गिरडकर, प्रदीप गेडाम, भाजपच्या सरचिटणीस विद्या देवाळकर, नांदगाव येथील माजी जि.प. सदस्य मनोहर देऊळकर, काँग्रेसचे सुनील शेंडे उपस्थित होते.जनसुनावणीत महाराष्ट्र प्रदूषण मंडळाला चांगलेच धारेवर धरण्यात आले. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योग आहेत. या उद्योगांच्या प्रदूषणामुळे जिल्ह्यात नागरिकांच्या आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी जाणिवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा रोष यावेळी दिसून आला.

Continue Reading

046-हिंगणघाट मतदार संधामध्ये लोकसभा निवडणूकी करिता हिंगणघाट निवडणूक प्रशासन सज्ज.तालुका प्रतिनिधी सुनिल हिंगे अल्लिपुर दिनांक 26/04/2024 रोजी होणाऱ्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 046- हिंगणघाट मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्य झालेले आहे. वर्धा लोकसभा अंतर्गत 046-हिंगणघाट मतदार संघामध्ये खालील प्रमाणे एकुण मतदार :- 2890761. पुरुष मतदार :- 1485142. महिला मतदार :- 1405623. नवमतदार (18-19 वयोगट) :- 39334. तरुण मतदार (20-29 वयोगट) :- 506475. एकुण मतदान केंद्र :- 341 (मुळ मतदान केंद्र 336 व सहायकारी मतदान केंद्र 5 )तसेच मा. निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये 4 पर्दानशिन मतदान केंद्र , 2 युवा मतदान केंद्र,2 पिंक बुथ आणि 1 दिव्यांग मतदान केंद्र यांचा अंतर्भाव आहे. सदर निवडणुकीत एकुन 32 क्षेत्रीय अधिकारी काम पाहत असुन त्यांचे सोबत 1 पोलीस अधिकारी नेमण्यात आलेला आहे. तसेच मतदानकेंद्रनिहाय मतदान पथके तसेच पोलिस बंदोबस्त तयार असून दिनांक 25/4/2024 ला साहित्याचे वाटप सकाळी 8.00 वाजेपासुन सुरू करण्यात येणार आहे. मतदानाची दिवशी मतदान केंद्रावर EVM मध्ये काही बिघाड झाल्यास तात्काळ योग्य कार्यवाही करीता विशेष पथके तयार करण्यात आलेली आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत आणि सुरळीत पार पडतील हे सुनिश्चित करण्याकरिता एकुन 170 मतदान केंद्रावर वेबकास्टींग साठी कॅमेरे लावण्यात आलेले असुन वेबकास्टींगचे थेट प्रक्षेपण मा. निवडणूक आयोग, तसेच मा. निवडणूक निर्णय अधिकारी, 08-वर्धा लोकसभा मतदार संघ तसेच सहा. निवडणूक निर्णय अधिकारी हिंगणघाट विधानसभा मतदारसंघ यांना नियंत्रण कक्षात दिसणार आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान टक्का वाढविण्याचे दृष्टीकोणातुन तसेच युवा मतदार, महिला मतदार यांचे मतदान वाढावे याकरिता मतदार जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत. तसेच मतदार केंद्रावरती मतदारांकरिता आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून वाढत्या उष्णतेपासुन त्रास होऊ नये याकरिता शेडची उभारणी करण्यात आलेली आहे. प्रत्येक मतदानकेंद्रावर आरोग्य पथक तसेच मतदार सहायता कक्ष स्थापीत करण्यात येणार आहे. दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रात जाण्याकरिता व्हिलचेअर तसेच त्यांना मदत करण्याकरिता स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. सर्व पात्र मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणे सुलभ जावे याकरिता मतदानाचे दिवसी सार्वजनिक सुटटी जाहीर केलेली आहे. करिता सर्व मतदार यांना आव्हान करण्यात येते की, सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता उत्सफुपर्तपणे सहभाग नोंदवावा तसेच लग्न समारंभ व इतर सण समारंभाप्रमाणेच लोकशाहिच्या या महोत्सवात सर्व मतदारांनी सामील होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

Continue Reading

चंद्रेश्वर महादेव संस्थानच्या वतीने प्रसाद व पाण पोईचे आयोजन

प्रतिनिधी : अशोक इंगोले (हिंगोली ) हिंगोली :वसमत वसमत-परभणी रोडवर चिखली पाटीच्या जवळ चंद्रेश्वर महादेव संस्थानच्या वतीने प्रसाद व पाणपोईचे आयोजन श्री रोशन गिरीजी महाराज यांच्या वतीने करण्यात आले व प्रसादाचा लाभ सर्व भक्तांनी घ्यावा असे अहवानही त्यांच्या कडून करण्यात आले आहे.या ठिकाणी चंदेश्वर महादेव संस्थांन चे महंत श्री रोशन गुरुजी महाराज व प्रमोद काळे […]

Continue Reading

होळीच्या दिवशी हि प्रहारचे रुग्णसेवेलाच महत्व वर्धा

( ब्यूरो )वर्धा वर्धा आज सर्वत्र होळीचा उत्सव सुरू आहे पण सर्वांना प्रचिती असलेला प्रहार जनशक्ती पक्ष आपल्या रुग्णसेवेचा वसा प्रामाणिकपणे जोपासत आहे समुद्रपुर तालुक्यातील रुग्ण कस्तुरबा रुग्णालय सेवाग्राम येथे उपचारासाठी भरती आहे रिध्दिमा वामन बारेकर रा आर्वी ता समुद्रपुर जि वर्धा या रुग्णाला दोन युनिट रक्ताची आवश्यकता हि बाब जेव्हा प्रकारचे वर्धा जिल्हाप्रमुख जयंत […]

Continue Reading

वसमत शहरातील सर्व मुख्य 23 रस्ते होणार सिमेंट क्राॅक्रीटचे आ.राजू भैय्या नवघरे

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली वसमत : वसमत राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नाने वसमत शहरात विकासासाठी भरघोस निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान रस्ते अंतर्गत आज दि. 15 मार्च रोजी वसमतशहरामधील मुख्य 23 रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा लालपोटू इन्फोटेक ,हाऊसिंग सोसायटी ,वसमत येथे आज सकाळी 11 वा.सोहळा संपन्न होणार […]

Continue Reading

हजरत मौलवी साहब दर्गाहाचा १३३ वा उर्स उत्साहात संपन्न

प्रतिनिधी : अशोक इंगोले ( हिंगोली) हिंगोली : (प्रतिनिधी) वसमत येथील प्रसिद्ध दर्गाह हजरत बैहरुल-उलुम मौलाना मौलवी शाह मोहम्मद गुलाम नकशबंद अलमारुफ मौलवी सहाब किबला रहे. मुसाफिरशहा मोहल्ला मस्जिद मौलवी साहबचा १३३ वा उर्स नुकताच उत्साहात संपन्न झाला आहेहजरत खारी शाह मोहम्मद ताजोद्दीन उमर फारोखी अल खादरी सज्जादा नशीन व मुतवल्ली दर्गाह हजरत मौलाना मौलवी […]

Continue Reading

भ्रष्ट ठेकेदारामुळे पुलगाव नगर परिषद कंत्राटी मध्ये लागलेल्या कर्मचाऱ्याचे तब्बल पाच ते सहा महिन्यापासून मासिक वेतन मिळालेच नाही याकरिता भीम आर्मी विदर्भ प्रमुख यांचा कार्यालयात गुपनियद्वारे निवेदन.

प्रतिनिधि : अरबाज पठाण (पुलगांव) नगर रचना संचालन मुंबई द्वारा पुलगाव नगरपालिकेला सूचना देऊन नोटीस देऊन व शासनाच्या जीआर नुसार कुशल कामगार अर्धकुशल कामगार यांच्या नियोजनानुसार त्यांच्या हक्काचे किमान वेतन आणि शासनाद्वारा दिलेल्या विविध स्तरावर वाढीव भत्ता विमा इत्यादी योजनेचा त्यांना लाभ देण्यात यावा याकरिता शासनाने विविध स्तरावर जीआर सुद्धा काढले आहे कंत्राटी मध्ये ठेकेदाराचा […]

Continue Reading

साइकिल पाकर बालिकाओं के चेहरों पर आई मुस्कान

प्रतिनिधि :अब्दुल रहमान राजस्थान विजयनगर विजयनगर के निकटवर्ती ग्रामसिंगावल के राजकीय विद्यालय में राज्य सरकार द्वारा बालिकाओ को साइकिल वितरण कार्यक्रम आयोजित हुआ। कार्यक्रम में साइकिलों का वितरण किया गया। आयोजित कार्यक्रम में मुख्य अतिथि स्थानीय सरपंच रघुनाथ गुर्जर के सानिध्य में सम्पन्न हुआ।कार्यक्रम की अध्यक्षता शाला के प्रधानाचार्य श्री अरविंद कुमार सवासिया ने की। […]

Continue Reading

दिंडोरा बॅरेज वर शेतकरी महिलांचा वाढीव मोबदला आणी प्रकल्प ग्रस्त च्या इतर मागणी साठी प्रकल्पग्रस्त महिलांचे आंदोलन.

तालुका प्रतिनिधी –पवन ढोके वरोरा चंद्रपूर, वर्धा आणी यवतमाळ जिल्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्पावर् आज दी -12/3/2024 महिलांचा समिक्शा ताई गणवीर यांचा नेतृत्वात जनक्रोश मोर्चा निगाला यावेळी 32 गावातील जवाडपास 400 ते 500 महिला ह्या मोर्चा साठी आलेल्या होत्या ,त्यांनी अनेक नारे निदर्शने देऊन प्रशासन आणी शासनाचे मोर्चा कळे लक्ष वेधून प्रकल्पाचे काम […]

Continue Reading

हिंगोलीत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.

(हिंगोली) प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची श्रृंखला उभारून या जिल्ह्याचासिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल सिंचन साखळीतून हिंगोली चा औद्योगिक विकास करण्यासाठी आमच्या शासन कटिबध्द असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्ली.हिंगोली येथील रामलीला मैदानावर “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या योजनांचे हजारो […]

Continue Reading