हिंगोलीत झालेल्या शासन आपल्या दारी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद.

सोशल

(हिंगोली) प्रतिनिधी: अशोक इंगोले

हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर्णा पैनगंगा व अन्य नद्यांवर साखळी बंधाऱ्यांची श्रृंखला उभारून या जिल्ह्याचासिंचनाचा अनुशेष दूर करण्यात येईल सिंचन साखळीतून हिंगोली चा औद्योगिक विकास करण्यासाठी आमच्या शासन कटिबध्द असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिल्ली.हिंगोली येथील रामलीला मैदानावर “शासन आपल्या दारी” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वेगवेगळ्या योजनांचे हजारो लाभार्थी व जिल्हाभरातून मोठ्यासंख्येने नागरिक या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्रात आतापर्यंत पाच कोटी वर लाभार्थ्यांना शासन आपल्या दारी योजनेतून विविध योजनांचा लाभ देण्यात आला आहे. हिंगोली जिल्ह्यांमध्ये विविध विभागांच्या शासकीय योजना मधील 14 लक्ष 52 हजारावर लाभार्थ्यांना जिल्ह्यांमध्ये लाभ मिळाला आहे हा लाभ 774 कोटी रुपयांचा असून आज यापैकी बहुतेक लाभार्थ्यांची कार्यक्रमाला उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या व्यासपीठावर हिंगोली चे खासदार हेमंत पाटील ,सर्वश्री आ.वि विप्लव बाजोरिया, तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, वसमत चे आमदार राजू भैय्या नवघरे, बालाजी कल्याणकर, विभागीय आयुक्त मधुकर राजे अर्दड, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

CLICK TO SHARE