दिंडोरा बॅरेज वर शेतकरी महिलांचा वाढीव मोबदला आणी प्रकल्प ग्रस्त च्या इतर मागणी साठी प्रकल्पग्रस्त महिलांचे आंदोलन.

अन्य सोशल

तालुका प्रतिनिधी –पवन ढोके वरोरा

चंद्रपूर, वर्धा आणी यवतमाळ जिल्यासाठी अत्यंत महत्वाचा असलेला दिंडोरा बॅरेज प्रकल्पावर् आज दी -12/3/2024 महिलांचा समिक्शा ताई गणवीर यांचा नेतृत्वात जनक्रोश मोर्चा निगाला यावेळी 32 गावातील जवाडपास 400 ते 500 महिला ह्या मोर्चा साठी आलेल्या होत्या ,त्यांनी अनेक नारे निदर्शने देऊन प्रशासन आणी शासनाचे मोर्चा कळे लक्ष वेधून प्रकल्पाचे काम बंद पाडले, जोपर्यंत प्रकल्प ग्रस्त शेतकरी, शेतमजूर, मच्चीमार बांधव,आणी अनेक गावाचे पुनर्वसन असल्या मागण्या पूर्ण होत नाही तो पर्यंत आमी महिला प्रकल्पाचे काम सुरु करू देणार नाही असे प्रकल्पचे अधिकारी ला ठामपणे सांगितले.प्रकल्प ग्रस्तावर होत असलेल्या अन्याया विरोधात हा मोर्चा काढण्यात आला होता, या मोर्चाचे निवेदन मारेगावं चे तहसीलदार श्री उत्तम निलावड यांच्याकडे देण्यात आले,दिंडोरा प्रकल्पग्रस्तावर होत असलेल्या अन्याया विरोधात हा महिला मोर्चा मारेगाव तालुक्यातील सावंगी मधून काढण्यात आला होता, सरकारचे लक्ष वेढण्यासाठी महिला नी हे आंदोलन केले, या आंदोलनाला मार्गदर्शन करण्यासाठी देवराव भोंगडे, समीक्षा गणवीर यांची मुख्य उपस्थिती होती या समितीमध्ये अध्यक्ष पुंडलिक तिजारे उपाध्यक्ष अभिजित मांडेकर, सचिव चंपत साडवे ,यांनी वाढीव मोबदला मिडल्याशिवाय प्रकल्पाचे काम होऊ देणार नाही असा इशारा देत आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.या महिला मोर्चाचे नेतृत्व सुजाता भोंगडे, समीक्षा गणवीर यांनी केले.

CLICK TO SHARE