वसमत शहरातील सर्व मुख्य 23 रस्ते होणार सिमेंट क्राॅक्रीटचे आ.राजू भैय्या नवघरे

सोशल

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत : वसमत राजू भैया नवघरे यांच्या प्रयत्नाने वसमत शहरात विकासासाठी भरघोस निधी मंजूर झाला असून या निधीच्या माध्यमातून शहराचा कायापालट होणार महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान रस्ते अंतर्गत आज दि. 15 मार्च रोजी वसमतशहरामधील मुख्य 23 रस्त्यांचा भूमिपूजन सोहळा लालपोटू इन्फोटेक ,हाऊसिंग सोसायटी ,वसमत येथे आज सकाळी 11 वा.सोहळा संपन्न होणार असून या कार्यक्रमाचे उद्घाटन माजी मंत्री जयप्रकाश जी दांडेगावकर यांच्या हस्ते उद्घाटन झाले सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. राजू भैया नवघरे उपस्थित होते.तर मुख्य अतिथी म्हणून डॉक्टर सचिन खल्लाळ (उपजिल्हाधिकारी वसमत),सौ शारदा दळवी (तहसीलदार वसमत) कुंदनकुमार वाघमारे (पोलीस निरीक्षक शहर पोलीस स्टेशन), शिवदास बोडेड्वार(अध्यक्ष शिवेश्वर बँक वसमत, अ हफिज अ रहेमान (सरचिटणीस काँग्रेस महाराष्ट्र), अनिल काच मांडे (ग्रामीण सोपिन) ,निलेश सुंकेवार( मुख्याधिकारी न प वसमत),अंबादासराव भोसले (माजी जि प अध्यक्ष हिंगोली) तानाजी बेंडे सभापती कृ.उ.बा. वसमत सुनीलभाऊ काळे( सहसंपर्क प्रमुख शिवसेना उ.बा.ठा) डॉ एम आर क्यातमवार (अध्यक्ष डॉक्टर असोसिएशन) ,सुभाष लालपोतू (अध्यक्ष व्यापारी महासंघ), श्रीनिवास पोराजवार माजी नगराध्यक्ष चंद्रकांत बागल (राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विधानसभभा अध्यक्ष) ,काशिनाथ भोसले (शिवसेना वसमत शहर अध्यक्ष उ.बा.ठा.), शेख अलीमोद्दीन (शहराध्यक्ष कॉंग्रेस),त्र्यंबक कदम (तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस), भगवान कुदाळे (माजी नगराध्यक्ष),शेख मो. ‌‌अय्युब( नगराध्यक्ष राष्ट्रवादी), मुजीब पठाण (शहराध्यक्ष रा. कॉ.पा वसमत) प्रभाकर श्रीरसागर (शहराध्यक्ष शिवसेना वसमत) आदी मान्यवर या भुमी पुजन सोहळ्या प्रसंगी उपस्थित होते शहरातील एकुण डि पी23 रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन एकाच ठिकाणी झाले असून. त्याअनुषंगाने शहरातील या भूमिपूजन सोहळ्याच्या माध्यमातून 23 रस्ते व नाली बांधकाम या भूमिपूजन सोहळा नंतर सुरू होणार आहे. शहरातील एकूण रखडलेल्या व रहदारीच्या रस्त्याचे भाग्य उजळणार असून तसेच रस्त्यालगत दोन्ही बाजूने नाली बांधकाम होणार असल्याने शहराच्या विकास कामात मोठी भर आ. राजू भैया नवघरे यांच्या माध्यमातून होणार आहे.

CLICK TO SHARE