जलालखेडा पोलिस यांची दमदार कामगिरी

अन्य

उत्तर प्रदेश येथील घर सोडून निघालेल्या मतीमंद मिसिंग मुलाला केलं नातेवाईकांच्या ताब्यात

प्रतिनिधी:साजिद पठाण नागपुर

दिनांक 03/01/2024 रोजी ग्राम -परसोडी (दीक्षित) येथे गावामध्ये अनोळखी मतिमंद मुलगा फिरताना आढळून आल्याने ग्राम -परसोडी (दीक्षित) येथील पोलीस पाटील टेकाडे यांनी त्याला विचारपूस केली असता तो कोणताही पत्ता व काही माहिती सांगत नसल्याने पोलीस पाटील व गावातील काही इसम यांनी त्यास पोलीस स्टेशन जलालखेडा येथे आणून हजर केले. सदर अनोळखी मतिमंद मुलगा याला पोलीस स्टेशन येथे मा. ठाणेदार सा. सी. बी. चौहान व स्टाफ यांनी अत्यंत कसोशीने व बारकाईने विचारपूस केली असता त्याने आपले नाव मयंक असे सांगितले व तो ग्राम- हतेरी ता- जालौन जि- जालौन (उत्तर प्रदेश)असे त्यांनी सांगितल्यावरून त्यास अजून बारकाईने विचारपूस केली असता त्याने त्याचा भाऊ अंकित देवचरण लकीरा याचा मोबाईल क्रमांक दिला सदर मोबाईल क्रमांकावर कॉल करून विचारपूस केली असता मयंक हा मागील काही दिवसापासून घर सोडून आलेला आहे अशी माहिती मिळाली व तशी मिसिंग कंप्लेंट रजिस्टर करण्यात आलेली आहे.असे त्याचे परिवारातील लोकांनी सांगितले.मिसिंग मुलगा नामे मयंक याचे परिवारातील लोकांना पोलीस स्टेशन जलालखेडा येथे बोलून सुखरूप त्यांचे नातेवाईकाचे ताब्यात देण्यात आले. सदरची कार्यवाही — मा. ठाणेदार सा. चेतनसिंग चौहान, यांचे मार्गदर्शनात Gpsi/ जोशी साहेब, संजय रिधोरकर साहेब, आशिष हिरुडकर साहेब, किशोर कांडेलकर साहेब यांचे पथकाने केली.

CLICK TO SHARE