पत्रकाराचे अपहरण नसून षडयंत्र चौकशी ची मागणी

अन्य

प्रतिनिधी सचिन वाघे (हिंगणघाट )

हिंगणघाट :- पोलीस स्टेशन येथे अपहरण संदर्भात विक्की शाहु ने दिलेले बयान हे पूर्णपणे बनावट आहे विक्की कोटेवार याने अपहरण केले हे सिद्ध होत नाही हिंगणघाट पोलीस स्टेशन मध्ये कलम 364- A,385,386,120 – B,34 गुन्हे दाखल केले या वरून पोलीस कार्यवाही वर संशय निर्माण झाला आहे.दुसरीकडे हिंगणघाट येथील सोनु आर्या याने अमरावती जिल्हातिल नांदगाव पेठ येथे दी.14/5/2023 ला निलेश वैरागडेला बळजबरीने चाकूचे धाकाने गाडीत बसवून अमरावती शहराचे बाहेर 15 ते 20 कि.मी. दूर एका व्यायामशाळेत नेऊन त्याला लाथाबुक्याने व पाईप तसेच पट्याने मारहाण केली. त्या मारहाणीत तो बेशुद्ध पडल्याने त्याच्या तोंडावर लघवी सुध्दा केली आणि त्याचे प्यान्ट काढून मागच्या भागात बियर टाकली इतका अमानवीय अत्याचार केलासोनु आर्य (पत्रकार)व इतरानवर पोलीस स्टेशन नांदगाव पेठ ला ला अपराध 8. 216/2023 कलम 363, 368, 34 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला.विक्की शाहु हा स्वतः सुपारी घेऊन सरकारी जागेवरील अतिक्रमण काडते त्याचे पुरावे सोनु आर्या हा स्वतःच दुसऱ्याचे अपहरण करते याचा सुद्धा पुरावा आहे. हिंगणघाट येथे अपहरण नसतानाही अपहरण प्रकरणात कठोर गुन्ह्यांची नोंद तर दुसरीकडे अपहरण केले व अमानवीय कृत्य करूनही सोनु आर्या याच्यावर नांदगाव पेठ येथे कठोर गुन्ह्यांची नोंद नाही.त्यामुळे या प्रकरणात सोनु आर्या, विक्की शाहु यांचा पोलीस रेकॉर्ड तपासून तसेच दिलेल्या बयान याचे विश्लेषण केल्यास दिलेले बयाणात विसंगती दिसते. त्यामुळे या प्रकरणात चौकशी करण्याची मागणी होत आहे.

CLICK TO SHARE