प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा हिंगोली ची आढावा बैठक संपन्न

अन्य

प्रतिनिधी : अशोक इंगोले (हिंगोली)

हिगोली : आज दि.07/01/2024 रोजी प्रहार जनशक्ती पक्ष जिल्हा हिंगोली ची हिंगोली येथील शासकीय विश्रामगृह याठिकाणी बैठक आयोजित करण्यात आली होती यामध्ये हिंगोली जिल्ह्यात यासमोर वंदनीय राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे विचार प्रहारच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेमध्ये व प्रत्येक गावामध्ये पोहोचण्याचे काम प्रहारच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून करून जिल्ह्यातील प्रहारची ताकद वाढवायची आहे असे बैठकीमध्ये चर्चा करण्यात आली तसेच या बैठकीच्या माध्यमातून हिंगोली जिल्ह्यातील काही पदाधिकाऱ्यांच्या नियुक्ती करण्यात आली आहे यामध्ये कळमनुरी तालुका अध्यक्षपदी बाळासाहेब खिल्लारे,वसमत शहराध्यक्षपदी शेख हाजी शे.हुसैन,सोशल मीडियाप्रमुख पदी जीवन शेषराव आडे,वसमत तालुका उपाध्यक्षपदी बंडू खराटे, करंजाळा सर्कल प्रमुख पदी दिलीप राजेवाड या सर्वांची नियुक्ती आज रोजी जिल्हाप्रमुख रवी उर्फ राॅबट बांगर यांच्या हस्ते करण्यात आली तसेच याच्या माध्यमातून प्रहार जनशक्ती पक्षाचे संघटन जास्तीत जास्त वाढवण्याचे काम तसेच येणाऱ्या भविष्यकाळात प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक लढवणार असे आदेश वरिष्ठांच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष रवि उर्फ राॅबट बांगर यांनी दिले यावेळी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानरे,प्रहार चे जिल्हा संघटक विलास आघाव, जिल्हाकोषाध्यक्ष गणेश जाधव, जिल्हा सचिव पिंटु ऊर्फ भागवत शिनगारे,वसमत चे तालुकाध्यक्ष विष्णू जाधव,हिंगोली तालुका संघटक सागर काठोळे, औंढा तालुका सचिव पवन राठोड, कळमनुरी तालुका युवाध्यक्ष बंटी शेळके पाटील तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते…..

CLICK TO SHARE