श्री क्षेत्र पारडसिंगा गावी अनुसया मातेच्या पालखी सोहळ्यात असंख्य भक्त जण

धर्म

प्रतिनिधी:संजय भोजने पारडसिंगा(काटोल)

काटोल:(दि.12)काटोल तहसील लगत नऊ( 9)किलोमिटर अंतरावर असलेले पारडसिंगा गावी विदेही सती अनुसया माता पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम दिनांक सहा (6)जानेवारी ते दिनांक तेरा (13)दरम्यान सुरू आहे त्या निमित्ताने आज दिनांक 12 पालखी सोहळा निघाली या पालखी सोहळ्यात दूर दुरून मातेचे भक्तजन मोठ्या प्रमाणात उपस्थित होते पालखी मध्ये गावातील व बाहेर गाव वरून आलेले 25 ते 30 भजन मंडळ उपस्थित होते पालखी मातेच्या मंदिर पासून तर पूर्ण गावात वेढा मारून मंदिराला वापसी परतली मातेच्या स्वागतासाठी गावकर्यांनी जागो जागी झेंडे पताके व रांगोळी काढली होती तर युवकांनी जागो जागी नाश्ता पाण्याची चहा अशी वेग वेगळी उपाय योजना केली होती हा पालखी सोहळा आनंदाने पार पडला या पालखीत देवस्थानचे अध्यक्ष मा.श्री चरणसिंग ठाकूर, सरपंच निळूभाऊ तिजारे,दिलीप भाऊ तिजारे,दिलीप वरोकर,शेषराव टाकरखेडे,सुरेश येवणे,नीलकंठ मदनकर,आकाश ढोके,निलेश गाढवे,शरद बेलसरे,प्रवीण डागोरे,गिरीश वरोकर, प्रियंका भोजने,अलका कामठे,अनिता येवले,सुजाता डबरासे,महीला मंडळ ग्राम पंचायत सभासद गावकरी मंडळी व भक्त जन मोठ्या संख्येने उपस्थित होते.

CLICK TO SHARE