हयातनगर येथे क्रिकेट टूर्नामेंटची उद्घाटन संपन्न

सोशल

अशोक इंगोले : प्रतिनिधी हिंगोली

वसमत :हयात पाशा यात्रेनिमित्त टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन हायात नगर येथे अनिल सारंग हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष युवक काँग्रेस यांनी व गावकऱ्यांनी आयोजित केले असता हयात नगर येथील क्रिकेट लीग टूर्नामेंटचे उद्घाटन भगवती हॉस्पिटलचे संचालक डॉ. अंकुश देवसरकर तसेच सौ. प्रीती ताई जयस्वाल महाराष्ट्र प्रदेश जनरल सेक्रेटरी यांच्या हस्ते संपन्न झाले त्यावेळी अंकुश देवसरकर साहेब यांनी हिंगोली जिल्ह्यात काँग्रेस पक्षाची वातावरण निर्मिती होत असल्याचे दिसून येत आहे असे भाषणातुन मनोगत व्यक्त केले,काँग्रेसच्या नेत्या प्रीतीताई जयस्वाल यांनी वसमत विधानसभेमध्ये काँग्रेस पक्षाचे विविध उपक्रम राबविण्यात येत असल्याचे सांगितले, तळागळा मध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता एकजूट व्हावा पक्ष संघटन मजबूत व्हावे येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्या पक्षाला मोठी संधी निश्चितच मिळेल असे प्रीती ताई जयस्वाल यांनी सांगितले,काँग्रेस पक्षाचे मा.कार्याध्यक्ष मुनीर पटेल, जिल्हा उपाध्यक्ष एकनाथ सूर्यवंशी, तालुका अध्यक्ष राजाराम खराटे, जिल्हा सरचिटणीस तुकाराम कदम, आबा कदम, कमानराव मुळे, गावातील असंख्य गावकरी मंडळी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

CLICK TO SHARE