संविधानाच्या तरतुदीनुसार समाजात समता प्रस्थापित झाल्यास कोणीही कोणावर अत्याचार करणार नाही-डॉ. नामदेव किरसान

अन्य

तालुका प्रतिनिधी:अजय दोनोड आमगांव (गोदिया)

आज दि.१३/०१/२०२४ रोजी मौजा आरमोरी ता.आरमोरी जि. गडचिरोली येथे श्री नटराज नाट्य कला मंडळ बर्डी विद्यानगर आरमोरी यांच्या वतीने “अत्याचार” या नाट्यप्रयोगाच्या उद्घाटन प्रसंगी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी महासचिव डॉ. नामदेव किरसान यांनी आपल्या भाषणात समाजात जाती धर्माच्या नावावर भेदभाव न करता एकता व अखंडता टिकवून ठेवण्याची गरज असून, भारतीय संविधानातील तरतुदीनुसार समतेची जोपासना झाल्यास, जाती धर्म समानता व स्त्री-पुरुष समानतेचे तत्व पाळल्यास तसेच संपत्तीचे समतेच्या धोरणावर वाटप झाल्यास कोणीही कोणावर अत्याचार करणार नाही असे आवर्जून सांगितले. यावेळी माजी आमदार रामकृष्णजी मडावी, माजी आमदार हरिरामजी वरखडे, आमदार कृष्णाजी गजबे, संस्थापक सचिव महेश बाळासाहेब तितीरमारे, नगराध्यक्ष नगर परिषद आरमोरी पवनजी नारनवरे, सामाजिक कार्यकर्ता रामदासजी मसराम, सदानंदजी कुथे सर, विनोदभाऊ झोडगे, डॉ.मसराम साहेब, विलासभाऊ पारधी, जगदीश मेश्राम, नगरसेविका सौ. गीताताई शेलोकर, नगरसेविका सौ.सुनीताताई मने, नरेंद्रजी मडावी, आकाश भाऊ, रुपेश भाऊ, झोडे सर, कोकाटे सर, लिंगायत सर, वट्टी सर, रामटेके सर, गणमान्य मंडळी व मोठ्या संख्येने प्रेक्षक उपस्थित होते

CLICK TO SHARE