बल्लारपूर ते हैदराबाद पॅसेंजर व एक्सप्रेस ट्रेन लवकर सुरू करा-तेलुगू वारी फाऊंडेशन

अन्य

शहर प्रतिनिधी:नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बुधवार दि-17/01/2024- बल्लारपूर शहरात तेलगू भाषिकांची संख्या 37% च्या जवळपास आहे. हा भाग तेलंगाना व महाराष्ट्राच्या सीमेच्या जवळपास आहे व बल्लारशा रेल्वे जंक्शन असल्याने याठिकाणी प्रवाशांची नेहमीच अधिक गर्दी असते. कौटुंबिक , व्यावसायिक व इतर कारणांसाठी तेलगू भाषिक प्रवासी महाराष्ट्र-तेलंगाना असा सतत प्रवास करीत असतात परंतु रामगिरी पॅसेंजर व भाग्यनगरी एक्स्प्रेस बंद झाल्यानंतर इथल्या तेलगू भाषिकांना सतत त्रास सहन करावा लागत आहे. हि गोष्ट लक्षात घेऊन शहरातील तेलुगू वारी फाऊंडेशन ने यासंदर्भात रेल्वे प्रशासनास निवेदन देऊन बल्लारपूर-काजीपेट तसेच हैदराबाद साठी ट्रेन लवकरात लवकर सुरू करण्याची मंगणी केली. जर असे झाले नाही तर तेलूगू भाषिकांच्या हितासाठी आक्रमक भुमिका घेण्याचे ही आव्हान देखील करण्यात आले. यावेळेस तेलुगू वारी फाऊंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष- रविकुमार पुप्पलवार, उपाध्यक्ष- आनंद महाकाली, सचिव- प्रा. नागेश्वर गंडलेवार, कोषाध्यक्ष- उमेश कोलावार, संजय मुपीड़वार, श्रीनिवास आऊला, गणेश सिलगमवार, मलेश येल्लावार, श्रीनिवासन तौटवार आणि इत्यादी संस्थेचे सभासद व पदाधिकारी उपस्थित होते.

CLICK TO SHARE