अजय दोनोडे तालुका प्रतिनिधी आमगांव (गोदिया
पो. ठाणे अंबाझरी, नागपूर येथे दाखल लैंगिक अत्याचार गुन्ह्यातील फरार आरोपीस संशयास्पद स्थितीत लोकांच्या गर्दीमध्ये फिरत असताना गोंदिया शहर पोलिसांनी शिताफीने घेतले ताब्यात याबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 22 जानेवारी 2024 ला संपुर्ण देशात प्रभु श्रीराम यांचे अयोध्या येथे होणाऱ्या प्राण प्रतिष्ठा समारोह निमित्याने कायदा सुव्यवस्था शांतता अबाधित राखण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले होते…. आणि याच अनुषंगाने गोंदिया जिल्ह्यात सुध्दा पोलीस अधिक्षक, गोंदिया मा. श्री. निखील पिंगळे, अपर पोलीस अधिक्षक, गोंदिया, श्री. नित्यानंद झां, यांचे आदेशान्वये आणि मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता… गोंदिया शहर परीसरात उपविभागीय पोलीस अधिकारी,गोंदिया, श्री. प्रमोद मडामे, पो.नि. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी यांचे मार्गदर्शनात पो. स्टे. गोंदिया शहर हद्दीत वरिष्ठांनी दिलेल्या निर्देश सुचनांप्रमाणे पोलीस स्टेशन गोंदिया शहर येथील गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार हे कायदा सुव्यवस्था, संबंधाने बंदोबस्त, गुन्हेगार शोध, प्रभावी गस्त, करीत होते… त्यादरम्यान नेहरु चौक गोंदिया या ठिकाणी रस्त्यावरील नागरीकांचे गर्दीमध्ये एक इसम हा चेहऱ्यावर दुपट्टा बांधुन संशयास्पद स्थितीत दिसुन आला…..त्याचे संशयास्पद हालचाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार पोशि कुणाल बारेवार यांनी चाणाक्ष व चौकस नजरेने हेरून संशयित ईसंम नामे – रूपलाल उर्फ संजु उर्फ संजय गजराज महातो, वय 24 वर्ष, रा. पांढराबोडी, रामनगर, नागपुर यास पोलीस स्टाफ ने ताब्यात घेतले. लोकांच्या गर्दीमधुन त्यास अलगद बाजुला घेवुन त्याचेकडे चौकशी केली असता…….त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली.. त्याचे बाबत अधिकची माहिती घेतली असता सदर संशयित इसम हा *पोलीस ठाणे. अंबाझरी, नागपुर शहर* येथील *गुन्हा.रजि.क्रं. 37/2024 कलम 363, 376, भादंवि, सहकलम* 4, 8, 12 पोस्को या गुन्हयातील आरोपी असून गुन्हा करुन नागपूर येथून पळुन गेलेला असल्याबाबत माहीती मिळाली….सदर त्याबाबत वरिष्ठांना आणि अंबाझरी पोलीसांना माहीती देण्यात आली…….. मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाप्रमाणे लैंगिक अत्याचार करणाऱ्या गुन्हेगारास *पोलीस ठाणे अंबाझरी, नागपुर शहर* पोलीसांचे ताब्यात देण्यात आले आहे… सदरची कामगिरी मा. वरिष्ठांचे मार्गदर्शनाखाली, पो.नि. श्री. चंद्रकांत सुर्यवंशी, यांचे मार्गदर्शनात पोलीस स्टेशन गोंदिया शहर गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार- पोहवा भाटीया, उईके, लोंदासे, टेंभरे, शेंन्डे, रहांगडाले, चव्हाण, मपोहवा- चौव्हाण, पोशि बारेवार, रहांगडाले,बिसेन, रावते, सोनवाने यांनी केलेली आहे.