राजाराम मध्ये रंगणार भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा, माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन

खेल

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

अहेरी:-तालुक्यातील राजाराम (खां) येथे भव्य व्हॉलीबॉल स्पर्धा रंगणार असून नुकतेच माजी जि प अध्यक्ष तथा सिनेट सदस्य भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते उदघाटन संपन्न झाले.येथील शिवराम स्टेडियम वर गोंडवाना गोटूल क्लब द्वारा भव्य ग्रामीण व्हॉलीबॉल सामन्यांचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेसाठी प्रथम ३० हजार,द्वितीय २० हजार, आणि तृतीय १० हजार आणि आकर्षक शिल्ड असे पारितोषिक ठेवले आहे.पहिल्यांदाच मोठया स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याने जवळपास ४० चमुनी या स्पर्धेत सहभाग घेतला.नुकतेच माजी जि प अध्यक्ष भाग्यश्री ताई आत्राम यांच्याहस्ते या भव्य व्हॉलीबॉल स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले.यावेळी त्यांनी उपस्थित खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतः मैदानात व्हॉलीबॉल मॅच खेळून आनंद लुटला व उपस्थितांना मोलाचे मार्गदर्शन केले.उदघाटन प्रसंगी सह उदघाटक म्हणून येथील सरपंच मंगला आत्राम,अध्यक्ष म्हणून तिरुपती कुळमेथे, प्रमुख पाहुणे म्हणून ग्रा प सदस्य विनायक आलम,ग्रा प सदस्य सुशीला सोयाम, खांदलाचे उपसरपंच राकेश सिडाम, अनिताआलम, प्रफुल मारकवार,विजय अंबिलपवार,महेश कुसराम, सत्यवान आलाम, शारदाबाई आत्राम,सीताराम पोरतेट,शारदाबाई आलाम, दर्याबाई सडमेक,बबलू गावडे, वसंत सडमेक,आनंद वेलादी, जयराम आत्राम, वेंकटेश अर्का आदी मान्यवर उपस्थित होते.

CLICK TO SHARE