पोलिस स्टेशन बल्लारपूर येथे संविधान जागर कार्यक्रम

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : बल्लारपूर पोलिस स्टेशन चा प्रांगणात २८ जानेवारी रविवार रोजी संविधान जागर चा कार्यक्रम घेण्यात आले सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण तंडी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या कार्यक्रमात शंकरराव वेलेकर,इंजि शेषराव संसारे,सो.गायत्री रामटेके, पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम तसेच संविधान जागर चे मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यकमात सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण तंडी, शंकरराव वेलेकर सर,इंजि. शेषराव संसारे,सौ. गायत्री रामटेके, मुख्य प्रवर्तक अशोक घोटेकर यांनी संविधान विषयी माहिती दिली.पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी एक सुरेख गीत गायिले संविधान जागर चे एक हजार कार्यक्रम करण्याचे मानस असून बल्लारपूर पोलिस स्टेशन येथील १३७ वा कार्यक्रम होता.तसेच १लाख पुस्तक वाटणार आहेत. कार्यक्रमाला शहरातील नागरिक तसेच पोलिस स्टेशन कर्मचाऱ्यांची उपस्थितीत होती. कार्यक्रमाचे संचालन व आभारप्रदर्शन पोलिस उपनिरीक्षक वर्षा नैताम यांनी केले.

CLICK TO SHARE