अवैध दारूबंदीसाठी लाडबोरीच्या महिलांचा एल्गार

अन्य

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

सिंदेवाही पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या लाडबोरीत मागील काही दिवसांपासून अवैध दारूचा महापूर असल्याने गावातील शांतता, सुव्यवस्था धोक्यात आली आहे. महाविद्यालयीन आणि शाळकरी विद्यार्थीसुद्धा दारूच्या आहारी जात असल्याने महिलांनी गावातील दारूबंदीसाठी कंबर कसली असून लाडबोरीची अवैध दारूविक्री त्वरित बंद करण्याच्या मागणीसाठी एल्गार पुकारत तहसील कार्यालयावर धडक दिली. यावेळी शेकडो महिलांनी दारूबंदीच्या मागणीचे निवेदन तहसीलदार व ठाणेदारांना दिले.

CLICK TO SHARE