चिखली येथे शिवविचाराची शिवजयंती साजरी करण्यात आली

अन्य

प्रतिनिधी:विजय बागडे जामगाव

काटोल:तालुक्यातील चिखली ( मैना ) येथे शिवजयंती निमित्त विचारधारा फाउंडेशन & बळीराजा ग्रुप काटोल यांच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रतिमा भेट देऊन सर्व गावकऱ्यांच्या वतीने स्थापित करण्यात आली. सतीश काळे फ्रेंड सर्कल व सर्व गावकऱ्यांच्या वतीने शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला उपस्थित जवाब दो यात्रेचे संयोजक सागर दुधाने ( युवा नेते), समाजसेवक गुलाबरावजी तागडे, भाऊरावजी काळे, विठ्ठलराव काळे, दिलीप काळे, गणपत दुपारे, चींधूजी पाटील, प्रेमदास दुपारे, बाबाराव डफरे, संदीप काळे,पंकज ठाकरे, सुरज जी दुपारे, धर्माजी काळे, ज्ञानेश्वर काळे, अतुलजी गावंडे, भावेश दादा दुपारे, शीला शिंडे , सुजाता पाटील, संध्या ताई तागडे, व इतर सर्व ग्रामपंचायत पदाधिकारी, पोलीस पाटील, गावातील ज्येष्ठ नागरिक, नागरिक, महिला, युवक व युवती उपस्थित होते. उपस्थित सर्व नागरिकांना शिवरायांचे विचार आचरणात कसे आणता येईल. त्याचबरोबर गावाचा विकास व सामाजिक एकोपा निर्माण करून कशाप्रकारे साध्य करता येईल. यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. आभार प्रदर्शन A .V.फाउंडेशनचे संचालक-विकासजी सोमकुवर यांनी केले व शिवजयंतीचा कार्यक्रम शांततेत पार पडला.

CLICK TO SHARE