बहुजन पँथर सेनेचे बेमुदत धरणे आंदोलनाचे 11 वा दिवस

अन्य

प्रतिनिधी: अशोक इंगोले हिंगोली

सोलापूर :सोलापूर शहर जिल्ह्यातील तरुणाई नासवनाऱ्या त्याचबरोबर तरुण पिढीला बरबाद करणाऱ्या उच्चभ्रू व श्रीमंत लोकांच्या मनोरंजनाचे चोचले पुरवणाऱ्या सोलापूर शहर व जिल्ह्यात अनेक बेकायदेशीर डान्सबार असून सदरचे बेकायदेशीर डान्सबारला आशीर्वाद कोणाचा? कोणाच्या परवानगीने असे डान्सबार चालतात? सदरची बाब आता लपून राहिलेली नाही सोलापूर शहर जिल्ह्यातील बेकायदेशीर डान्सबार बाबत यापूर्वी देखील अनेकांनी तक्रारी केल्या होत्या परंतु कारवाई करेल ते प्रशासन कसले ? लक्ष्मी दर्शनाच्या लाभाने तर डान्सबार चालत नाहीत ना ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांमधून विचारला जात आहे सोलापूर शहर जिल्ह्यातील बेकायदेशीर डान्सबार वर कायदेशीर कारवाई करण्यासाठी प्रशासनाला कोणता मुहूर्त हवाय? सोलापूर येथे बहुजन पॅंथर सेनाच्या संस्थापिका अध्यक्षा- निशाताई बचुटे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर शहर जिल्ह्यातील ग्रामीण भागात बेकायदेशीर / विनापरवाना व शासनाची परवानगी नसताना सुद्धा सुरू असलेले आर्केस्ट्रा बार/ डान्सबार 1) हॉटेल गॅलेक्सी आर्केस्ट्रा बार , 2) हॉटेल एप्पल आर्केस्ट्रा बार, 3) हॉटेल कॅसिनो आर्केस्ट्रा बार 4) हॉटेल विजयराज आर्केस्ट्रा बार 5) हॉटेल पुष्पक आर्केस्ट्रा बार ,6) हॉटेल बुरगुंडा आर्केस्ट्रा बार या सर्व आर्केस्ट्रा/डान्सबार यांचे जागेचे मालक, डान्सबार चालक व बारबालांवर फौजदारी गुन्हे दाखल करून आर्केस्ट्रा/डान्स बार कायमस्वरूपी बंद करण्यात यावे , तसेच संबंधित अधिकारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी ,बीट अंमलदार, तपास अधिकारी यांची खातेनिहाय चौकशी करून प्रचलित कायद्यान्वये गुन्हे दाखल करावे या सर्व मागण्यांसाठी बहुजन पँथर सेनेच्या वतीने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येत आहे या आंदोलनाचा 11 वा दिवस आहे यावेळी संस्थापिका अध्यक्षा – सौ. निशा ताई बचुटे , राष्ट्रीय उपाध्यक्षा – संगीता ताई कवाळे , कोल्हापूर जिल्हा सचिव चंद्रकला ताई कांबळे , मिरज तालुकाध्यक्ष – सौ अनुराधा जगधने, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष नंदाताई हेगडे , सांगली जिल्हा अध्यक्ष – प्रशांत कांबळे , सांगली जिल्हा कार्याध्यक्ष – दत्ताभाऊ जगधने , महाराष्ट्र राज्य कलाकार संघटना अध्यक्ष सिनेस्टार – सुभाष तुपे सर , तसेचसोलापूर शहर अध्यक्ष – सोहेल जहागीरदार , सोलापूर जिल्हाध्यक्ष – बाबुराव सोनवणे , सोलापूर जिल्हाध्यक्षा महिला आघाडी – लक्ष्मीताई लोंढे सहभागी झालेले आहेत.

CLICK TO SHARE