बांधकाम कामगारांना नुतणीकरणमध्ये सवलत द्याआमदार राजुभैय्या नवघरे यांची शासन दरबारी मागणी-प्रशासनाने घेतली दखल

अन्य

प्रतिनिधी:अशोक इंगोले हिंगोली

वसमत :ग्रेस पिरीयड मधिल नोंदीत बांधकाम कामगारांना नुतणीकरणमध्ये ९० दिवसाचे प्रमाणपत्राची सवलत देऊन त्यांचे तात्काळ नूतनीकरण करुन देण्याची मागणी वसमत चे आमदार राजू भैया नवघरे यांनी शासन दरबारी केली आहेइमारत व इतर बांधकाम मंडळ मुंबई येथे सचिव आयुक्तांची प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार महोदयांनी कामगारांच्या अडचणी मांडल्या त्यांनी दिलेल्या पत्रानुसार बांधकाम कामगारांनी मागील ४/५ वर्षापनासून बांधकाम कामगार म्हणून नोंदणी केलेली आहे. परंतु सन २०१९-२०, २१-२२ मध्ये लॉक-डाऊन असल्यामूळ ब-याच कामगारानी नुतणीकरण केलेले नाही त्यांना सध्यस्थितीत नूतनिकरण करण्यासाठी (प्रलंबित नुतणीकरण) असलेल्या कालावधीतील प्रमाणपत्र जोडावे लागत आहे.परंतु ग्रामसेवक, व न.प. सीईओ हे मागील कालावधीमध्ये कामे बंद होतो कारनाने कामगारांना ९० दिवसाचे प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे नोंदीत गरीब कामगार शासनाच्या या योजनेपासून वंचित राहत आहेत.त्यामुळे कामगारांना चालु वर्षाचे ९० दिवसाचे प्रमाणपत्र देवून त्यांचे नुतणीकरण करुन देण्यात यावे यासाठी आपले स्तरावरुन स्थानिक पातळीवरील अधिकारी यांना पत्र काढुन सुचना देण्याची मागणी त्यांनी पत्राद्वारे शासनदरबारी केली आहेप्रशासनाने घेतली दखल——————–महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या जिल्हा कार्यकारी अधिकारी राजश्री पाटील यांनी सरकारी कामगार अधिकारी हिंगोली यांना पत्र पाठवून आमदार नवघरे यांच्या पत्राचे अवलोकन करून आपल्या स्तरावर कारवाईच्या सूचना दिल्या आहेत यामुळे नूतनीकरणाचा मार्ग मोकळा होवुन हिंगोली जिल्ह्यातील कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे

CLICK TO SHARE